Sharad Pawar : “आपली माणसे” म्हणून निवडून आणा, पुढच्या निवडणुकीत त्यांनाच पाडा; पवारांच्या चाणक्यगिरीचा वाचा धडा!!

Sharad Pawar

नाशिक : Sharad pawar : “आपली माणसे” म्हणून निवडून आणा, पण पुढच्या निवडणुकीत त्यांनाच पाडा!!; पवारांच्या चाणक्यगिरीचा वाचा धडा!!, असे म्हणायची वेळ खुद्द शरद पवारांच्या डावपेचांनी आणली आहे. शरद पवार पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ते वेगवेगळे डाव टाकत आहेत. अशा बातम्यांनी मराठी माध्यमांचे रकाने भरलेत, पण पवारांच्या पायांची भिंगरी पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राच्या पलीकडेच जायला तयार नाही आणि त्यांनी रचलेले डाव हे प्रामुख्याने अजित पवारांचे मंत्री आणि ते उभे करणार असलेले उमेदवार यांना पाडण्यातच वाया चालले आहेत.

ज्या प्रकारे शरद पवारांनी मावळ मधून सुनील शेळके, हडपसर मधून सुनील टिंगरे, परळीतून धनंजय मुंडे किंवा कागलमधून हसन मुश्रीफ वगैरे आमदारांना घेरले आहे, ते पाहता पवारांचे डावपेच आपणच आपली माणसे म्हणून निवडून आणलेल्या पहिल्या – दुसऱ्या टर्मच्या आमदारांना पाडण्यात खर्च होणार आहेत. Sharad pawar

अखंड राष्ट्रवादीची लढत प्रामुख्याने भाजप आणि अखंड शिवसेनेच्या आमदारांशी प्रामुख्याने होत असे. पण आता पवारांच्या उमेदवारांची लढत प्रामुख्याने अजितदादांच्या उमेदवारांशीच करण्याची व्यूहरचना भाजपने आखल्याचे चित्र दिसू लागले आहे. याचा अर्थ पवार आपल्या पूर्वाश्रमीच्या राजकीय शिष्यांनाच आस्मान दाखवण्यासाठी विधानसभेच्या मैदानात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. यातून फार तर पवारांच्या आमदारांची संख्या त्यांच्या मूळ डबल डिजिटच्या आसपास पोहोचेल, पण घटणारी संख्या देखील अजितदादांची असल्याने, त्याचा ना कुठल्या अन्य पक्षांना तोटा होणार आहे, फायदा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे पवारांची लढाई म्हणजे काका पुतण्यांच्या डबल डिजिट तोकड्या संख्येची बेरीज आणि वजाबाकी ठरत आहे.

लोकसभा निवडणुकीत हिट ठरलेला “मॅन टू मॅन मार्किंग” फॉर्म्युला वापरुन अजित पवारांच्या आमदारांना नाकीनऊ आणण्याची रणनीती शरद पवारांनी आखल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. Sharad pawar

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपातून तुरुंगात गेलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक अणुशक्तीनगरचे आमदार आहेत. आता ते शेजारच्या शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी इथून तीनवेळा निवडून आले आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना अणुशक्तीनगरमधील रॅलीत सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक अणुशक्तीनगरमधून लढण्याची तयारी करत आहेत. पण तिथे शरद पवार नवाब मलिकांच्या विरोधकांना बळ देत आहेत.

अजित पवारांच्या मंत्री, आमदारांना पाडण्यासाठी शरद पवार लावत असलेली फिल्डींग भाजपच्या इच्छुकांना महागात पडू लागली आहे. अजित पवारांचे अनेक आमदार, मंत्री 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करुन विजयी झाले. आता अजित पवार गटच महायुतीत आल्याने गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या अनेकांना यंदाची निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे त्यांची चलबिचल सुरु झाली आहे. आमदारकी लढवण्यासाठी उत्सुक असलेले भाजपचे “निवडक” अनेक नेते पवारांच्या संपर्कात असल्याचे दावे मराठी माध्यमांनी केले आहेत. Sharad pawar

कोल्हापूरच्या राजघराण्यातून येणाऱ्या समरजीत सिंह घाटगेंनी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच शरद पवार गटात प्रवेश केला. पवारांनी लगेच त्यांची उमेदवारी जाहीर केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना ते कागलमधून आव्हान देतील. गेल्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष लढून 80000 पेक्षा जास्त मतदान घेतलं होतं. अजित पवारांना बंडात साथ देणाऱ्या मुश्रीफ यांना घेरण्याची तयारी पवारांनी केली आहे.


Rhea Barde : द फोकस एक्सप्लेनर : बन्ना शेख कशी झाली रिया बर्डे? भारतात अश्लील चित्रपट बनवले… अटकेतील बांगलादेशी पॉर्न स्टारची संपूर्ण कहाणी


अजित पवारांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कृषी मंत्री धनंजय मुंडेदेखील शरद पवारांच्या रडारवर आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख यांच्या मदतीनं मुंडेंसमोर आव्हान उभे करण्याची पवारांची खेळी आहे. देशमुखांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ते शरद पवार गटात प्रवेश करुन परळीतून मुंडेंविरोधात निवडणूक लढतील अशी शक्यता आहे. Sharad pawar

मराठा आरक्षण आंदोलनात राजासाहेब देशमुखांची महत्त्वाची भूमिका आहे. ते मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मराठा आरक्षणाचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला. याच कारणामुळे बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आता पंकजा यांचे बंधू धनंजय यांच्या पराभवासाठी शरद पवारांनी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे.

पवार उरले मराठ्यांचे नेते

या सगळ्या राजकीय मशक्कतीत पवारांची प्रतिमा आता फक्त मराठ्यांचे नेते म्हणून उरली आहे. पवार आत्तापर्यंत सार्वत्रिक म्हणजे सर्व समाजाचे नेते होते, पण आता ते फक्त पवार मराठ्यांचे नेते उरले आहेत, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच केली, पण पवारांच्या एकूण हालचालींवरून त्यांची वाटचाल त्याच दिशेने चालल्याचेच दिसले. कारण मराठवाड्यातले मराठा आंदोलन पश्चिम महाराष्ट्रात राजकीय फायद्यासाठी नेण्याचा पवारांचा डाव आहे. प्रकाश आंबेडकरांनी फक्त तसे नेमके निरीक्षण टिपले आहे. याचा अर्थ हाच की “आपली माणसे” म्हणून निवडून आणलेल्यांना पुढच्या निवडणुकीत पाडा आणि कसेही करून आमदारांच्या विशिष्ट संख्येबरहुकूम आपले राजकारण तरंगत ठेवा, या पलीकडे पवारांच्या चाणक्यगिरीच्या धड्याचा दुसरा कुठलाही “व्यापक” अर्थ नाही!!

Sharad pawar will defeat his own disciples in assembly elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात