जपानमध्ये प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमधील 48 लोक शंभरी ओलांडतात. जपानी लोक असे काय खातात की त्यामुळे त्यांचे आयुष्यमान वाढते. जपानी लोक काय खातात यापेक्षा ते कसे खातात, हे महत्त्वाचे आहे, असे नव्या संशोधनातून पुढे समोर आले आहे. Secrets of science: The secret of growing and healthy lifestyle in Japan is hidden in their diverse diet
इटलीमधील शंभरी ओलांडलेल्यांच्या अन्नात ऍनिमल फॅट कमी असल्याचे दिसून आले. जपानमध्ये हृदयविकाराने मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण जगात सर्वांत कमी आहे. आयुष्यमानाचा खाद्यसंस्कृतीशी संबंध आहे काय, यासाठी मोठा अभ्यास झाला. त्यानुसार जपानी खाद्यसंस्कृती एक विस्तीर्ण संकल्पना आहे. फक्त सुशी डिश घ्या, असे ती कधीच सांगत नाही. मासे, भाज्या, सोयाबीन, त्याचबरोबर सोया सॉस, भात व मिसो सूप यांचा समावेश जपान्यांच्या जेवणात आढळतो.
या डाएटमुळे जपानमध्ये हृदयविकार व कर्करोगाचे कमी रुग्ण आढळतात आणि आयुष्यमानही अधिक असते. जपानमधील टोहोकू विद्यापीठातील संशोधकांनी जपानमधील कोणत्या डाएटमुळे आयुष्यमान वाढते, यावर संशोधन केले. जपान व अमेरिकेत 1990मध्ये घेतलेले जाणारे डाएट त्यांनी उंदरांना तीन आठवड्यांसाठी दिले. विशेष म्हणजे, दोन्ही डाएटमध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने व कर्बोदकांचे प्रमाण सारखेच असूनही, जपानी डाएट घेतलेल्या उंदरांच्या पोटात व रक्तात चरबीचे प्रमाण कमी आढळले. म्हणजेच, तुमच्या ताटात मांस आहे की मासे, तांदूळ आहे की गहू या गोष्टी निर्णायक ठरतात. मात्र, जागतिकीकरणानंतर जपानी खाद्यसंस्कृतीही बदलली असल्याने आणखी सखोल संशोधनासाठी 1960, 1975, 1990 व 2005 मधील जपानी खाद्यसंस्कृती निवडली गेली.
या काळातील खाद्यपदार्थ उंदरांना देऊन आठ महिने निरीक्षणे नोंदवण्यात आली. त्यातून सर्वच जपानी डाएट एकसमान नसल्याचे दिसले. जपानी डाएटचे फायदे त्यातील शैवाल किंवा सोया सॉसमुळे नसून, अन्नघटकांत असलेल्या विविधतेत आहे. जपानी जेवण अनेक छोट्या डिशेसमधून तयार होते. पदार्थ तळण्यापेक्षा उकडले किंवा वाफवून घेतले जातात. या डिशेस सजवण्यासाठी वरून साखर किंवा मिठाऐवजी तीव्र चवीचे पदार्थ कमी प्रमाणात घातले जातात. संशोधकांचा हा सल्ला सर्वांच्याच उपयोगाचा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App