विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : नव्या वायफायमुळे जग होणार वेगवान


इंटरनेट ही आता चैनीची बाब राहिलेली नसून अत्यावश्यक गोष्ट बनलेली आहे. जगाचे संज्ञापन, अर्थकारण इंटरनेटच्या स्पिडवर अवलंबून आहे. याची सर्वांनाच एव्हाना जाणीव झालेली आहे. नेटचा स्पीड वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे ही सेवा अव्याहत वेगवान राहण्यासाठी नेमके काय करताय येईल यावर जगभरातील संशोधकांचे सतत नवनवे संशोधन सुरु असते. Science Destinations: The new WiFi will make the world faster

या प्रवासात आता नेदरलॅंडमधील संशोधकांनी नवा टप्पा पार पाडला आहे. आता सुरक्षित इन्फ्रारेड किरणांवर आधारलेल्या, सध्याच्या वायफाय नेटवर्कपेक्षा शंभर पट अधिक वेगवान आणि कोंडी न होता अनेक उपकरणांना जोडण्याची क्षमता असलेल्या वायरलेस इंटरनेटची र्निमिती करण्यात नेदरलँड्समधील एंडहोवन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे. या वायरलेस नेटवर्कची क्षमता ४० गिगाबिट्स प्रति सेकंद इतकी प्रचंड आहे, तसेच प्रत्येक उपकरणाला स्वतंत्र प्रकाश किरण मिळत असल्याने कोंडी होत नाही. ही यंत्रणा उभारण्यास सोपी आणि स्वस्त आहे. वायरसेल डेटा हा लाइट अँटेनाद्वारे पोहोचतो.

या अँटेनामधील ग्रेटिंग्जमधून वेगवेगळ्या वेव्हलेंग्थच्या प्रकाश किरण वेगवेगळ्या कोनातून उत्सर्जित केले जातात. प्रकाशाची वेव्हलेंग्थ बदलली की, प्रकाशकिरणाची दिशाही बदलते. या तंत्रज्ञानात सुरक्षित इन्फ्रारेड वेव्हलेंग्थचा वापर केला जात असल्यामुळे ती डोळ्याच्या दृष्टिपटलापर्यंत पोहोचत नाही. सध्याचे वाय-फाय सिग्नल २.५ किंवा ५ गिगाहर्टझ फ्रीक्वेन्सीच्या रेडिओ सिग्नलचा वापर करतात. मात्र नवीन यंत्रणा १,५०० नॅनोमीटर वेव्हलेंग्थच्या इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करते. त्यामुळे डेटाही क्षमता वाढते. संशोधकांना अडीच मीटर अंतरात ४२.८ गिगाबिट प्रतिसेकंद एवढे वेग गाठण्यात यश आले. सध्याच्या सर्वोत्तम वाय-फायचा वेग ३०० मेगाबिट प्रति सेकंद आहे. त्यापेक्षा नव्या वाय फायचा वेग जास्त असेल. या नव्या संशोधनाने जगाचा वेग आणखी वाढेल यात शंका नाही.

Science Destinations: The new WiFi will make the world faster

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात