आपले पहिले दोन वर्षांपूर्वीचे बंड फसल्यानंतर आता काँग्रेसचे राजस्थान मधले नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. ही उचल खाताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया थेट शब्दांमध्ये इशारा देऊन टाकला आहे. राजस्थानमध्ये हे वेळीच नेतृत्व बदल करा, नाहीतर राजस्थानचा “पंजाब” व्हायला वेळ लागणार नाही, अशा शब्दात सचिन पायलट यांनी सोनिया गांधींना सुनावल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी काँग्रेसमध्ये वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत. अर्थात या सूत्रांच्या बातम्यांमधले तथ्य किती?? आणि त्याचे लावलेले वेगवेगळे अर्थ खरे किती??, हा भाग अलहिदा. परंतु, जर खरंच सचिन पायलट यांनी आक्रमक भूमिका स्वीकारून थेट सोनिया गांधी यांना सुनावले असेल तर त्यामध्ये “राजकीय पंच” असल्याचे जरूर मानले पाहिजे…!!Rajasthan will be “Punjab”; Sachin Pilot’s wound
– प्रशांत किशोर एपिसोड
काँग्रेस आणि प्रशांत किशोर एपिसोड मधून काँग्रेस हायकमांड आपल्या पक्ष रचनेत आमूलाग्र बदल तयार करायला तयार होत नाही असा “राजकीय मेसेज” देशभर गेला आहे. त्यामुळे काँग्रेसने हायकमांडबद्दल आधीच देशात प्रतिकूल वातावरण असताना त्यात नाराजीची भर पडली आहे. नेमकी हीच राजकीय वेळ साधत सचिन पायलट यांनी राजस्थानात नेतृत्व बदलासाठी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. राजस्थानचा “पंजाब” होणे या इशाऱ्याचा अर्थ उघड आहे. पंजाब मध्ये काँग्रेसची नुसती सत्ता गेली नाही तर गटबाजीमुळे काँग्रेसची पुरती वाताहत झाली तशी वाताहात राजस्थानमध्ये होऊ शकते, असा हा इशारा आहे. नुसते अशोक गहलोतांवर प्रेम करत बसण्यात अर्थ नाही. त्यांच्यामुळे राजस्थान गमावला जाईल ही भीतीच सचिन पायलट काँग्रेस हायकमांडला घालत आहेत.
जमले तर आत्ताच अन्यथा…
2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेस तयारी करत असताना राजस्थान सारखे मोठे राज्य गमावून काँग्रेसला चालणार नाही हेही सचिन पायलट पुरते ओळखून आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्ये राहुन “जमले तर आत्ताच” नाही तर येत्या दोन-अडीच वर्षात आपला स्वतःचा मार्ग मोकळा करून भाजपच्या दिशेने जाण्याचा त्यांचा मनसूबा यातून दिसतो आहे.
– ज्योतिरादित्य शिंदे यांचे उदाहरण
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्रीपदाची वाट पाहिली. पण काँग्रेस हायकमांडने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले नाही. शेवटी कमलनाथ यांचे सरकार काँग्रेस घालवून बसली पण ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड मुख्यमंत्रीपदी केली नाही. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या मार्ग चोखाळत भाजपची वाट धरली तशीच वाट येत्या वर्ष दोन वर्षात सचिन पायलट यांनी धरली, तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App