विशेष प्रतिनिधी
प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना एकदा एका महिलेने विचारले होते, की तुम्ही कॉमन मॅन तर चितारलात. पण कॉमन वुमन का नाही चितारलीत??, त्यावेळी लक्ष्मण यांनी दिलेले उत्तर फार मार्मिक होते. ते म्हणाले, अ वूमन कॅन नेव्हर बी कॉमन!!… लक्ष्मण यांचे उत्तर त्यावेळी फार गाजले. पण लक्ष्मण यांनी त्यातून एस्केपिझम शोधल्याची टीका देखील झाली होती. आता त्यात त्यांनी खरंच एस्केपिझम शोधला की नाही हा भाग अलहिदा!!r. k.laxman’s comman man and woman’s day
पण खरंच लक्ष्मणने फक्त कॉमन मॅनच चितारला का??, तर नाही. लक्ष्मणने कॉमन मॅन बरोबर अनेकदा त्याची बायकोही चितारली. किंबहुना लक्ष्मणने त्यांचा कॉमन मॅन हा कायम गप्प आणि त्याची बायको बडबडी हे नेहमी दाखविले. या दोघांचेही डेपिक्शन हे परिपूर्ण चित्र होते!!
जे सर्वसामान्यपणे कॉमन मॅनला बोलता येत नाही किंवा तो बोलत नाही, ते कॉमन मॅनची बायको बोलते उघडपणे बोलते. सूचकपणे बोलते. पण ती देशाच्या, जगाच्या परिस्थितीवर कमेंट करतेच करते!! ती कॉमन मॅन बरोबर नेहमीच सावलीसारखी नाही, तर त्याच्या बरोबरीने वावरते. कॉमन मॅनला जसा मूक साक्षीदार बनायला कोणतेही ठिकाण आणि कोणताही विषय वर्ज्य नाही, तसाच कमेंट करायला त्याच्या बायकोलाही कोणतेही ठिकाण आणि कोणताही विषय वर्ज्य नाही!!
भारतीय समाजाचे हे चित्र लक्ष्मणने अबोल कॉमन मॅनच्या पण त्याच्या बोलक्या बायकोच्या रूपाने विलक्षणरित्या टिपले होते!!
समाजात आजही कॉमन मॅन तसाच आहे. तो महागाईने त्रस्त आहे. बेरोजगारीने ग्रस्त आहे. पण तो मूक आहे. मात्र त्यावर महिलाशक्ती निश्चित जास्त बोलकी आहे. किंबहुना जास्त कृतिशील आहे. महिलांचा भारताचा जीडीपीतला वाटा वाढतो आहे. महिला आंतरप्रूनर्सची संख्या, स्टार्टअपची संख्या महिन्यागणिक नाही, दिवसागणिक वाढते आहे. इथे जेंडर इक्वलिटी, जेंडर बॅलन्स हा विषयच नाही. सोशल बॅलन्स हा विषय आहे आणि हा सोशल बॅलन्स लक्ष्मणच्या कॉमन मॅन बरोबर असणाऱ्या त्याच्या बायको सारखी भारतीय महिला सांभाळत आहे!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्होकल फॉर लोकल ही घोषणा मध्यंतरी दिली होती. यातल्या व्होकल आणि लोकल दोन्हीही भूमिका भारतीय महिलांनी सर्वोत्तम रित्या आत्मसात केल्या आहेत. लक्ष्मणचा कॉमन मॅन आजही मूक आहे, पण त्याच्याबरोबरची त्याची बायको नुसती व्होकल नाही, तर ती व्होकल फॉर लोकलचा देखील आवाज बनून राहिली आहे… पण ते चितारायला आज आपल्यात लक्ष्मण नाही…!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App