गोड बोलणं कधी कधी एवढं होतं की कडूची सवय लागत नाही. म्हणून संतुलन ठेवणे गरजेचे असते. नात्याच्या नोकरदारीची भिक घेण्यापेक्षा तसे नसलेलेच बरे. बदल कोणाला घडवायचा असतो? कोणालाच नव्हे! लहान अपेक्षा मांडणे म्हणजे व्यक्तीमत्वाचा बदल करणे नव्हे! भूतकाळाला महत्त्व नसतं असे म्हणतात. साफ चूक! भूतकाळावरून अनूभव कळतो की कोण कसा वागणार,कोण कसा टीकणार आणि कोण कसा धूडकवणार. कधी त्रास होतो जेव्हा आपणच वाढवलेल्या रोपावर आपल्याला कुऱ्हाड फिरवावी लागते. मनात सर्व गोष्टी असतात पण त्या पिळवटून त्याचा खून कसा करायचा ते असल्यांसाठी खूप सोपे असते. Plant real seedlings in life
त्यांना मूल्याचा अर्थ माहित असून न समजण्यासारखा आहे तो. विचार मोठे मोठे पण प्रत्यक्षात मात्र काडीचे महत्त्व नाही. एक असा दिवस नक्की येतो,एक अशी परिस्थिती नक्की येते की कोणीही आपले आपल्याकडे राहत नाही पण परके मात्र आपलेसे करून घेतात कारण त्या परक्यांनीच एकावेळी त्यांच्या आपल्यांना परकं केलेलं असतं व त्यांना त्याची किंमत कळते कारण परिस्थिती माज उतरवते. त्यामुळे निश्चिंत रहावे! तो माज उतरणार जेव्हा बिकट परिस्थिती येईल,अगदी जीव जाईल एवढी पण त्यांच्यात जरी नसला तरी आपल्यात माणूसकीचा एक कण असतो. आपण तो जरी गृहीत धरला तरी त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो.
उपकारांच्या मोठ्या गोष्टी निभावणारे आधी उपकार काय असतात आणि कसे असतात त्याचा मूळ अर्थ समजणे आवश्यक आहे. वेळ,व्यक्तिमत्त्व आणि महत्त्व हे विषय सुद्धा उत्तीर्ण करावे लागतात. एखादी गोष्ट नको असेल तरी त्यावर गोंधळलेले असणे म्हणजे आपल्यासाठी ते फारच मोठे उपकार! आयुष्यात नातेरुपी खरी रोपे लावा, सुशोभित करणारी अन् दिखावा करणारी रोपे नाही कारण त्याकडून शून्य अपेक्षा असतात शेवटी ती कृत्रिमच तरी ती आपण भागवतो. दाखवण्यात येत असलेले दात कधीतरी पडणारच ते आपल्याला पाडायची काही गरज नसते!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App