Pawar – Fadanavis : नेते अजून प्रादेशिक, चर्चा देशभर; वयात मोठ्ठे 30 वर्षांचे अंतर…!!

“नेते अजून प्रादेशिक, चर्चा देशभर; वयात मात्र मोठ्ठे 30 वर्षाचे अंतर” अशी महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे. ही चर्चा खरंच देशभरात आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी त्यांची नावे आहेत. Pawar – Fadanavis: Leaders still regional, discussion across the country; Big age gap of 30 years … !!

– मोदींच्या नेतृत्वाशी तुलना

मध्यंतरी वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना होऊ शकते का??, असा विषय मांडला होता. यात भाऊंनी जो निष्कर्ष काढला तो योग्यच होता. मोदींशी पवारांची तुलना होऊ शकत नाही. कारण मोदी प्रादेशिक पातळीवरून देशव्यापी पातळीवर गेलेले यशस्वी नेते आहेत. पवार अजून प्रादेशिक पातळीवर रेंगाळले आहेत.

– फडणवीसांशी तरी तुलना होईल का?

खरं म्हणजे पवारांची मोदींची तुलना तर सोडाच, पण त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाशी तरी पवारांची तुलना होते का…??, याचा बारकाईने विचार केला तर वरच्या मुद्द्याचे उत्तर मिळते. “नेता अजून प्रादेशिक, चर्चा देशभर; वयात मोठ्ठे 30 वर्षांचे अंतर” हेच यातून स्पष्ट होते ना…!!

– 30 वर्षांपासून चर्चा

खरंच शरद पवार यांची देशभर गेल्या 30 वर्षांपासून चर्चा आहे. बरोबर 30 वर्षांपूर्वी ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आले. त्यानंतर गंगा, यमुना, बारामतीची कऱ्हा, गुजरात मधली नर्मदा यातून बरेच पाणी वाहून गेले. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेक नेते आले आणि गेले. पवार मात्र कायम आहेत.

– तीन आकडी आणि दोन आकडी

देवेंद्र फडणवीस 2014 पूर्वी येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. म्हणून प्रदेश पातळीवर त्यांचे नाव यायला लागले होते. भाजपने 2014 ची निवडणूक 123 जागा मिळवून जिंकली. तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते. राज्याच्या पातळीवर त्यांची चर्चा होती. त्यांना भाजपने मुख्यमंत्री केले. त्यांनी 5 वर्षे सत्ता टिकवली. 2019 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने 105 जागा मिळवत तीन आकडी संख्या गाठली. महायुतीला 161 जागा मिळाल्या. बहुमत मिळाले…!! पवारांना राष्ट्रवादीचा दोन डिजिटचा आकडा ओलांडता आलाय का??

– अकेला देवेंद्र!!

पण देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद हुकले. पण 2014 ते 2019 या 5 वर्षांत ते प्रदेश पातळीवरचे सर्वात मोठे नेते ठरले. 2019 नंतर विरोधी पक्षनेते म्हणून सुरुवातीला निष्प्रभ वाटणारे देवेंद्र फडणवीस वर्षभरातच झेप घेऊन “कार्यकारी मुख्यमंत्री” आहे असे वाटायला लागण्याइतपत प्रभावी व्हायला लागले… आणि आता 2022 मध्ये तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार एकीकडे आणि देवेंद्र फडणवीस दुसरीकडे अशी स्थिती झाली आहे…!!



– वय 52 आणि 82

फडणवीसांनी बिहार आणि गोव्यात भाजपला नंबर 1 करून दाखवले. उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस प्रादेशिक नेते आहेत. उगाच राष्ट्रीय लेबल लावण्यात मतलब नाही. पण वयाच्या 52 व्या वर्षी फडणवीसांची प्रादेशिक नेतृत्वावरची मांड पक्की होत असताना त्यांची चर्चा मात्र देशभर होते आणि बरोबर वयाच्या 52 व्या वर्षी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आलेल्या नेत्याची वयाच्या 82 व्या वर्षी देखील चर्चा देशभर त्याच पद्धतीने होत राहते…!!, याला नेमके काय म्हणायचे…?? कोणाचे नेतृत्व “उंच” म्हणायचे…?? कोणत्या नेतृत्वाची उंची खुजीच राहिली, असे म्हणायचे…??, हे ज्याचे त्याने ठरवावे…!!

– तुलना होईल का?

भले भाऊंसारखा ज्येष्ठ पत्रकारांनी मोदी आणि पवार यांच्या नेतृत्वाची तुलना केली असेल, पण मोदींचे नेतृत्व किती पुढे गेले आणि मोदींच्या नेतृत्वाशी तर स्पर्धा सोडाच फडणवीसांचा सारख्या 30 वर्षे लहान असलेल्या नेतृत्वाशी तरी पवारांची स्पर्धा शिल्लक राहिली आहे का…??, याचा ज्याने त्याने विचार करावा.

– निवडणूक जिंकणारे रसायन

जनमताच्या बळावर फडणवीस किती तरी पुढे निघून गेले आहेत. आणि त्यांची प्रतिमा देशभर “निवडणूक जिंकणारे रसायन” म्हणून एस्टॅब्लिश होते आहे. अशा वेळी 52 वर्षांचे फडणवीस मोठे नेते…?? की 82 वर्षांचे पवार मोठे नेते…?? वयाच्या ज्येष्ठत्वाशिवा शिवाय बाकी कोणते कर्तृत्व त्यांनी दाखवले असे म्हणायचे…??, हे ज्याचे त्याने ठरवावे.

– प्रादेशिकतेची मर्यादा कोणी ओलांडली?

बिहार आणि गोवा फडणवीसांनी संघटनेच्या बळावर जिंकून दाखवले. तिथे निवडणुकीत नियोजक म्हणून राबले. आपल्या नेतागिरीची जाहिरातबाजी त्यांनी केली नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि गोवा निवडणुकीसाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करूनही प्रत्यक्षात सर्वात मोठे स्टार प्रचारक तिथे फिरकलेही नाहीत. अशा वेळी प्रादेशिक कुंपणात अडकलेले नेते मोठे म्हणायचे…?? की प्रादेशिकतेची मर्यादा ओलांडून पुढे गेलेले नेते मोठे म्हणायचे…??, हेही ज्याचे त्याने ठरवावे…!!

Pawar – Fadanavis : Leaders still regional, discussion across the country; Big age gap of 30 years … !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात