मोदींनी 2024 साठीची परिभाषा बदलली; “इन्क्मबन्सी” – “अँटी इन्क्मबन्सी”ऐवजी निवडणुकीची गाडी “ट्रॅक रेकॉर्ड”वर आणली!!

नाशिक : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्याच झटक्यात 40-50 नव्हे, तर तब्बल 195 उमेदवार जाहीर करून लडखडत उभ्या राहिलेल्या “इंडिया” आघाडीला नुसते आव्हानच दिले असे नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निमित्ताने 2024 साठीची राजकीय परिभाषा बदलून टाकली. Party has announced candidates for some of the seats and will be announcing the rest in the coming days

खरं म्हणजे “इंडी” आघाडीतल्या वेगवेगळ्या घटक पक्षांनी आपले उमेदवार आधी जाहीर करून मोदींना खऱ्या अर्थाने बळकट आव्हान उभे करायला हवे होते, पण तसे करण्यात “इंडी” आघाडीतले सगळेच घटक पक्ष अपयशी ठरले. उलट ते आजही जागावाटपाचाच घोळ घालत बसले. त्या उलट भाजपने खरे राजकीय धाडस दाखवत एकदम 195 उमेदवार जाहीर केले.

आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये विद्यमान सरकारच्या बाजूने जनमताचा कौल म्हणजे “इन्क्मबन्सी”, तर विरोधातला कौल म्हणजे “अँटी इन्क्मबन्सी” असे शब्दप्रयोग निवडणूक काळात बहरात येत असत. त्या दोन शब्दांभोवतीस निवडणूक फिरवली जात असे. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा कौल मागताना मोदींनी “इन्क्मबन्सी” किंवा “अँटी इन्क्मबन्सी” ही परिभाषा बदलून टाकली आणि त्या ऐवजी “ट्रॅक रेकॉर्ड” हा शब्द समोर आणला.

195 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर मोदींनी कार्यकर्त्यांना उद्देशून दोन सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या त्यामध्ये त्यांनी “ट्रॅक रेकॉर्ड” हा शब्द वापरत आपला आत्मविश्वासच कार्यकर्त्यांमध्ये भरला. भाजप आणि केंद्र सरकार आपल्या सुशासनाच्या विकास कामांच्या “ट्रॅक रेकॉर्डच्या” आधारे जनमताचा कौल मागत आहे, असे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आवर्जून नमूद केले.

या सोशल मीडिया पोस्ट मध्ये त्यांनी विरोधकांवर बिलकुलच टीका टिप्पणी केलेली नाही. उलट सरकारने केलेल्या प्रगतीची फळे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळेच जनता आपल्या सरकारला पुन्हा आशीर्वाद देईल, असे आत्मविश्वासयुक्त उद्गार मोदींनी काढले. यातच त्यांनी 2024 लोकसभा निवडणुकीसाठीची परिभाषाच बदलल्याचे स्पष्ट केले.

मोदींनी लिहिलेली पोस्ट अशी

@narendramodi भाजपने लोकसभा निवडणुकीच्या काही जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून उर्वरित जागा येत्या काही दिवसांत जाहीर करणार आहे. भाजपचे उमेदवार म्हणून नामांकन मिळालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. केंद्र सरकारने केलेल्या सुशासनाच्या आणि विकास कामांच्या ट्रॅक रेकॉर्डच्या आधारे आम्ही लोकांना सामोरे जात आहोत. सरकारने साधलेल्या देशाच्या प्रगतीची फळे गरिबातील गरीबांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे भारताची 140 कोटी जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल. त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी आम्हाला आणखी शक्ती देईल, याची मला खात्री आहे.

 विरोधक अडकले जातीय निकषात

एकीकडे भाजपचे विरोधक आणि विश्लेषक भाजपने किती जात समूहांना लोकसभेत प्रतिनिधित्व दिले??, यात महिलांची संख्या किती आहे??, ती कमी आहे की जास्त आहे??, याचे आकडे शोधत बसले. काँग्रेसने या यादीत गुन्हेगार किती आहेत??, किती नाहीत??, याची आकडेवारी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या पलीकडे जाऊन मोदींनी सरकारच्या विकास कामांचे आणि सुशासनाचे “ट्रॅक रेकॉर्ड” हा शब्द आणत निवडणुकीची परिभाषाच अमुलाग्र बदलली. याकडे ना भाजपच्या विरोधकांचे आणि विश्लेषकांचे लक्ष केले, ना काँग्रेस प्रवक्त्यांचे लक्ष गेले. त्यांचे सगळे विश्लेषण जुन्या जातीय आणि वर्गीय निकषांभोवतीच फिरत राहिले!!

Party has announced candidates for some of the seats and will be announcing the rest in the coming days

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात