विशेष प्रतिनिधी
मुंबई : सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी बद्दल आपल्याला काही माहिती नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी तो त्यांच्या अधिकारात घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयाबद्दल मला कुणी काही विचारले नाही किंवा सांगितले देखील नाही, असे शरद पवारांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. मात्र त्याच वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुंबईत देवगिरी बंगल्यात सुनेत्रा पवारांच्या भेटीला पोहोचले होते.
सुनेत्रा पवार यांनी परस्पर उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पवारांशी चर्चा न करताच बारामती सोडून मुंबईला येण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार त्या काल रात्रीच बारामतीतून निघून मुंबईला येऊन पोहोचल्या. त्यानंतर आज सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवारांच्या निर्णयाची आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार किंवा अन्य कुणीही आपल्याशी चर्चा केली नाही. त्यांनी परस्पर निर्णय घेतला, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर 12 फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्र येतील असे ठरले होते. 12 फेब्रुवारीला त्याची घोषणा होईल, असेही ठरले होते, असे शरद पवार म्हणाले.
– पवारांना सांगावे लागले जाहीरपणे
सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणीच शरद पवारांशी चर्चा केली नाही, असे खुद्द पवारांनीच जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितल्यानंतर पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बागेत पोहोचले. मात्र, त्याच वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुंबईत देवगिरी निवासस्थानी सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतले आणि पवार कुटुंबातले अंतर्गत राजकारण एकाच वेळी बारामती आणि मुंबईत घडताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
– पवारांचे राजकीय महत्त्व घसरले
सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुणीही आपल्याशी चर्चा केली नाही, हे पवारांना जाहीरपणे सांगावे लागले आणि त्यांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले त्यामुळे पवारांचे आता कौटुंबिक निर्णयात सुद्धा किती “महत्त्व” “शिल्लक” उरले आहे, हे राजकीय सत्य अधोरेखित झाले. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व आता पवार कुटुंबातही प्रस्थापित झाले नाही, हे देखील स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App