नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी + आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल + शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे महाराष्ट्रासह देशात अराजक माजवायला एकत्र, पण निवडणुका लढवायला विभक्त होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या तिन्ही नेत्यांच्या विशिष्ट राजकीय हालचालींमधून त्यांच्या पुढच्या राजकारणाची वाटचाल दिसून येत आहे. ती वाटचाल म्हणजेच महाराष्ट्रासह देशात अराजक माजवायला एकत्र, पण पुढच्या सगळ्या निवडणुका लढवायला विभक्त!!, ही असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीत निराशा पसरली. आघाडीतले तीनही घटक पक्ष एकमेकांकडेच बोटे दाखवू लागले. त्यातही काँग्रेस आणि शिवसेना यांचे पुरते वाजले. शरद पवारांनी कोणाशी पंगा घ्यावा, अशी त्यांची स्थितीच उरली नाही. त्यामुळे त्यांनी आपली राजकीय बोट किनाऱ्यावरून चालवली.
पण महाराष्ट्रामध्ये दहशतीचे वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. महाराष्ट्रात सामाजिक न्याय उरलेला नाही, वगैरे नॅरेटिव्ह चालवायला शरद पवारांना मारकडवाडी, मस्साजोग आणि परभणी ही गावे मिळाली. या तिन्ही गावांचे दौरे करून पवारांनी राज्यात दहशतीचे वातावरण आहे, असा नॅरेटिव्ह चालविला.
पण त्या पुढे जाऊन राहुल गांधी + अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे देखील मारकडवाडी दौऱ्यावर येणार असून तिथे ते शरद पवारांनी केलेल्या प्रचाराचा पुनरूच्चार करणार आहेत. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येत असून ते सोमनाथ देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. शरद पवार आजच त्यांच्या कुटुंबीयांना भेटून आले.
Devendra Fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोकाअंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राहुल गांधी + उद्धव ठाकरे + प्रियांका गांधी + अरविंद केजरीवाल या सगळ्या नेत्यांचा मारकडवाडी दौरा ठरला असून उद्धव ठाकरे 5 जानेवारीला, तर उरलेले नेते 10 जानेवारीला मारकडवाडीला भेट देणार आहेत. तिथून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात ते एल्गार पुकारणार आहेत, पण या सगळ्यांचे लक्ष्य, उद्देश आणि हेतू एकच आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्याने आणि आणि हरियाणात भाजपचे आधीच सरकार आल्याने देशात सगळीकडे अराजक माजले आहे. सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावर तोड काढण्यासाठी दलित + मुस्लिम + ओबीसी समाजाने एकत्र येऊन देशभरात रस्त्या रस्त्यांवर आंदोलन माजवावे, हा जुनाच अजेंडा राबविण्याचा त्यांचा मनसूबा आहे.
– निवडणुका वेगळ्या लढवणार
असे असले तरी प्रत्यक्ष पुढच्या सगळ्या निवडणुका लढवण्याच्या बाबतीत मात्र राहुल ठाकरे आणि पवार हे विभक्त होण्याची चिन्हेही त्याच वेळी दिसू लागली आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेसंदर्भात शिव सर्वेक्षण करून घेऊन शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या दिशेने वाटचाल आधीच सुरू केली असून काँग्रेसशी सावरकर मुद्द्यावर आघाडी तोडायच्या मार्गाने ते पुढे निघाले आहेत. मुंबई महापालिका परिक्षेत्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दखल घेण्याइतपतही ताकद नसल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांची दखल घेतलेली नाही. उरलेल्या 13 महापालिका आणि महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदांमध्ये ठाकरेंची शिवसेना – राहुल गांधींची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. किंबहुना त्यांची तीच तयारी सुरू झाली आहे.
– केजरीवाल – काँग्रेस फारकत
महाराष्ट्रातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका तरी अजून दूर आहेत, पण दिल्ली विधानसभेची फेब्रुवारीत होणारी निवडणूक काँग्रेस आणि आम आदमी पार्टी विभक्त होऊनच लढणार आहेत. आम आदमी पार्टीने काँग्रेसशी आघाडी करण्याचा विचार झटकून टाकला. अरविंद केजरीवालांनी एका दणक्यात दिल्लीतले आम आदमी पार्टीचे सगळे 60 उमेदवार परस्पर जाहीर करून टाकले. त्या पाठोपाठ काँग्रेसनेही काही उमेदवार जाहीर करून टाकले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रासह देशात अराजक माजवायला जरी वर उल्लेख केलेले सगळे नेते एकत्र येणार असले, तरी प्रत्यक्ष निवडणुका लढवायला मात्र हे विभक्त झाल्याचे उघड्यावर आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App