नाशिक : एकेकाळी पंतप्रधान पदाच्या नावांमध्ये स्पर्धा; आता राज्यसभेची सीट तरी मिळेल की नाही, याची चर्चा!! अशा अवस्थेत शरद पवारांचे राजकारण येऊन पोहोचले.
1991 मध्ये शरद पवार पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत स्वतःहून पोहोचले होते. सुरेश कलमाडी यांच्यासारखे त्यांचे समर्थक दिल्लीच्या लॉबीमध्ये त्यांचे नाव लावून धरत होते. पण त्या स्पर्धेत शरद पवारांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दिल्लीच्या यमुने पासून ते बारामतीच्या कऱ्हा आणि नीरा या नद्यांमधून भरपूर राजकीय पाणी वाहून गेले आणि आता शरद पवारांना पुढची राज्यसभेची खासदारकीची टर्म मिळू शकेल की नाही, याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे त्यांना राज्यसभेत पुन्हा पाठवण्यात इतके आमदारांचे बळ नाही. कारण त्यांचे विधानसभेत फक्त 10 आमदार निवडून आलेत. पवारांना पुन्हा राज्यसभेत जायचे असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 41 आमदारांच्या साथीची त्यांना गरज आहे. पण अजित पवार महायुतीत असल्याने महायुतीतले श्रेष्ठी म्हणजेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. भाजपचे वरिष्ठ नेते विशिष्ट राजकीय किंमत चुकवून घेतल्याशिवाय शरद पवारांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा करायची शक्यता नाही आणि अगदीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांचा मार्ग मोकळा करायचा निर्णय घेतलाच तर पवार आपल्या म्हणजे भाजपच्या छत्रछायेखाली राज्यसभेत पोहोचले किंबहुना त्यांना पोहोचावे लागले याची वातावरण निर्मिती करण्यात भाजपचे नेते मागे हटणार नाहीत.
– ओवैसींनी पवारांना टोचले
ही सगळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊनच खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवारांना टोचले. शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेत निवडून येता येणार नाही. कारण त्यांच्याकडे तेवढे संख्याबळच नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला मोठा “तमाशा” बघायला मिळेल असा टोमणा असदुद्दीन ओवैसी यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना हाणला.
शरद पवारांना राज्यसभेत पोहोचायचे असेल, तर त्यांना भाजप बरोबर जुळवून घ्यावेच लागेल. त्याच्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही म्हणूनच मोठा “राजकीय तमाशा” करून पवारांना राज्यसभेचे दरवाजे खुले होतील, असे सूचक विधान ओवैसी यांनी केले. औवैसींनी या एकाच वक्तव्यातूनच शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला “राजकीय औकात” दाखवून दिली. पंतप्रधान पदाच्या नावाची स्पर्धा आता थेट राज्यसभेच्या सीटवरच्या चर्चेपर्यंत येऊन ठेपली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App