Fair skin = confidence?? : डस्की नव्हे, तर कॉन्फिडंट ब्युटी नंदिता दास!!

वैष्णवी ढेरे

आपण कितीही पुढारलेले किंवा पुरोगामी लिबरल आहोत असं म्हटलं तरीही आपली मूळ मानसिकता ही “सौंदर्य म्हणजे गोरेपणा” हीच आहे. एखाद्या जुनाट रूढीप्रमाणे सौंदर्याची कन्सेप्ट फक्त गोरेपणा आहे. ती मनात खोलवर रूजवली गेली आहे. एकतर मुलींकडे गोरेपणा असतो, नाहीतर त्या रेखीव असतात. अग गोरी नसलीस तरी काय झालं तुझा चेहरा रेखीव आहे, असं आजकालच्या मुलींना म्हटलं जात. पण शेवटी मूळ मुद्दा तोच उरतो “गोरेपणा म्हणजेच सौंदर्य” आणि मग बाकीचे अपवाद तयार होतात. त्याला डिफाइन करायला लागतात. Not dusky, but confident beauty Nandita Das

त्यातूनच सफर केलेली आणि त्यावर आवाज उठवणारी अभिनेत्री नंदिता दास सध्याच डिरेक्टर म्हणून आपल्याला दिसली आहे. ती नेहमीच सामाजिक विषयावरती भाष्य करताना दिसते आणि याची झलक तिने दिग्दर्शित zwigato या सिनेमात दिसून येते. आत्ताच तिच्या या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. नंदिताने बॉलिवूडमधल्या ग्लॅमर – रंगभेदावर गंभीर मते मांडली आहेत. रंगभेद करणाऱ्यांना मूळात सावळेपणाचा इतका तिटकारा का??, असा मुद्दा उपस्थित करत ती नेहमीच अशा विषयांसाठी खंबीरपणे आपली मतं मांडीत राहिली आहे. ती सावळी असल्याने, मीही बऱ्याचदा अशा अनुभवांना सामोरे गेली, असे ती सांगत असते. नंदिताने एका मुलाखतीत सांगितले, की अजूनही समाजातील रंगभेद संपलेलाच नाही.

सावळ्या रंगाच्या मुलींना ठराविकच रोल सिनेमात मिळतात. एकतर ती खलनायिका, नाहीतर एखादी कुठली तरी साधी मुलगी, अशाच भूमिकांमध्ये कायम सावळ्या मुली दिसतात. माझ्यावर लिहिले जाणारे लेख देखील “डस्की ब्युटी नंदिता दास” या नावानेच असतात. यावरून मला प्रश्न तयार होतो की माझी ओळख फक्त रंगावरून आहे का??, मी कधी फेअरनेस क्रीम वापरल्या नाहीत. क्रीम लावा आणि गोरे व्हा ही कन्सेप्ट अजून कायमच आहे आणि लहानपणीचे नातेवाईकांनी दिलेले टोमणे तर विचारायलाच नकोत. उन्हात खेळू नकोस ते हळद चंदन स्कीनवर चोपड इथपर्यंत सगळे सल्ले नातेवाईकांनी देऊन झाले. तू एवढी डार्क असून तुझात तेवढा कॉन्फिडन्स कसा काय??, असे प्रश्न देखील विचारले गेले. जरा मोठा झाल्यावर लक्षात आलं ही माझी त्वचा, माझा रंग, माझ्या आयुष्य त्याच्या सोबतच आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी यावर आवाज उठवला.

“इंडियाज गॉट कलर “/ “डार्क इज ब्युटीफूल” अशी मोहीम नंदिता दास हिने सुरू केली. रंगावरून केला जाणारा भेद हे थांबून प्रत्येकाला आपल्या रंगाचा अभिमान वाटावा. त्यांचा कॉन्फिडन्स वाढवा याचसाठी ही मोहीम सुरू केली गेली. यावर नंदिताने एक म्युझिक व्हिडिओ तयार केला. त्यात बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते. आता नंदिता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. कायमच सामाजिक गोष्टींवर मतं मांडणारी नंदिता दास हिचा हा सिनेमा देखील तितकाच प्रभावशाली ठरेल. आणि तिने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे वर्षानुवर्षे चालत आलेल्या सौंदर्याच्या कन्सेप्ट मध्ये बदल होण्यास मदत होईल हे नक्कीच वाटते.

Not dusky, but confident beauty Nandita Das

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात