एक नूर आदमी, दस नूर कपडा ही म्हण प्रसिद्ध आहे. मात्र आता वेगळी समस्या उद्भवू लागली आहे. जगभरात रोज कोट्यवधी नवे कपडे खरेदी केले जातात तितकेच किंवा त्येपक्षा जास्त कपडे टाकून दिले जातात. या टाकून दिलेल्या कपड्यांची मोठी समस्या सध्या जगाला भेडसावत आहे. कपडे कोणत्या मटेरिअलपासून बनलेले असतात, यावर या प्रश्नाची तीव्रता ठरते. कपड्यांमध्ये नैसर्गिक यार्न, मानवनिर्मित फिलामेंट, प्लॅस्टिक व धातू वापरले जातात. उदा. शंभर टक्के कॉटनचे टी-शर्ट घेतले, तरी त्याचे लेबल व शिवणासाठीचे धागे पॉलिस्टरसारख्या मटेरिअलपासून बनवलेले असतात. कॉटन जीन्समध्येही इलास्टेन, बटन व धाग्यांमध्ये पॉलिस्टर असते व विविध प्रकारचे डायही वापरले जातात. त्यामुळे या सर्व गोष्टी वेगळ्या करून त्यांचा पुनर्वापर करणे अवघड होते. New techniques of clothing recycling developed in Hong Kong
हे काम हाताने करण्याची प्रक्रिया संथ असते व त्यासाठी निष्णात कारागीरही लागतात. रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये दाखल झालेल्या कपड्यांपैकी सहा टक्के कपडे पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे नसल्याने त्यांचा उपयोग उद्योगांमध्ये यंत्रे पुसण्यासाठी, पायपुसणे किंवा मोटारीच्या सीटच्या आतमध्ये केला जातो. फायबर रिसायकलिंग पद्धत कमी प्रमाणात अस्तित्वात आहे. अभियांत्रिकी प्रक्रियेतून छोट्या आकाराचे धागे परत मिळवता येतात, मात्र त्यांचा दर्जा खूपच कमी असल्याने थर्मल इन्सुलेशन किंवा कार्पेट निर्मितीत त्यांचा उपयोग होतो. रासायनिक प्रक्रियेत पॉलिस्टर व नायलॉनवर प्रक्रिया करता येते, मात्र अनेक प्रक्रिया व रसायने वापरल्याने तयार झालेले धागे खूप महाग असतात. आता बुरशीचा वापर करून कॉटन आणि पॉलिस्टरच्या मिश्र धाग्यांचे रिसायकलिंग तंत्र हॉंगकॉंगमधील संशोधकांनी शोधले आहे.
बुरशी कॉटनचे विघटन ग्लुकोजमध्ये करते आणि शुद्ध पॉलिस्टरचा पुनर्वापर करता येतो. हल्ली टी-शर्ट, शर्ट व जीन्सही पॉली-कॉटनपासून बनलेले असतात व त्यामुळे भविष्यात हे तंत्र उपयोगी ठरेल. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी एन्झाइम्सचा उपयोग करून रिसायकलिंगचे तंत्र विकसित केले आहे. मात्र, कपड्यांची निर्मिती करतानाच रिसायकलिंगचा विचार केल्यासच ही समस्या सुटेल असे संशोधक सांगतात. कपड्यांचा कमीत कमी वापर व पुनर्वापर हाच या समस्येवरचा उपाय आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App