विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानीतील अत्यंत महत्त्वाच्या पंतप्रधान संग्रहालयातल्या पंडित नेहरूंची संबंधित ऐतिहासिक दस्तऐवजांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 51 पेट्या सोनिया गांधींनी घरी नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून संबंधित दस्तऐवज पंतप्रधान संग्रहालयाला सोनिया गांधींनी परत करावेत यासाठी पंतप्रधान संग्रहालयाच्या सदस्यांनी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहेत.
सध्याचे पंतप्रधान संग्रहालय हे पूर्वी नेहरू मेमोरियल म्हणून ओळखले जायचे मोदी सरकारने फक्त ते नेहरू मेमोरियल न ठेवता सर्व पंतप्रधानांचे संग्रहालय म्हणून विकसित केले. पूर्वी नेहरू मेमोरियल ट्रस्टवर गांधी परिवारातील सदस्य ट्रस्टी होते आता पंतप्रधान संग्रहालय हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या आले असून त्याची जबाबदारी सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.
Maharashtra cabinet expansion : पहिल्याच झटक्यात 39 मंत्र्यांसह फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; नव्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बदलला!!
1971 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित दस्तऐवज नेहरू मेमोरियलला दान केले होते. मात्र 2008 मध्ये काही कारणे देऊन सोनिया गांधींनी पंडित नेहरूंची संबंधित ते दस्तऐवज परत मागितले होते त्यावेळी नेहरू मेमोरियल ट्रस्टने त्यांच्या विनंतीनुसार एक-दोन नव्हे, तर तब्बल 51 पेट्या दस्तऐवज सोनिया गांधींच्या घरी पाठवले होते. ते अद्याप त्यांच्याच ताब्यात आहेत.
पंतप्रधान संग्रहालयाचे सदस्य आणि अहमदाबादचे इतिहासकार रिजवान कादरी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये सोनिया गांधींना पत्र लिहून पंतप्रधान पंडित नेहरूंची संबंधित असलेले दस्तऐवज पंतप्रधान संग्रहालयाला परत करण्यासंदर्भात विनंती केली होती. परंतु त्याची त्यावेळी दखल घेतली गेली नव्हती. आता रिजवान कादरी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पत्र लिहून संबंधित दस्तऐवज पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द करण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे.
– नेमके दस्तऐवज कोणते??
या दस्तऐवजांमध्ये पंडित नेहरूंनी विविध नेत्यांना लिहिलेली पत्रे, तसेच विविध नेत्यांनी पंडित नेहरूंना लिहिलेली पत्रे आहेत. यामध्ये पंडित नेहरूंचा अल्बर्ट आईन्स्टाईन, लॉर्ड माऊंटबॅटन, लेडी माउंटबॅटन, पद्मजा नायडू, जयप्रकाश नारायण, अरुणा असफ अली, विजयालक्ष्मी पंडित, बाबू जगजीवन राम आदींशी झालेला पत्रव्यवहार अस्तित्वात आहे. तो सध्या सोनिया गांधींच्या ताब्यात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App