Nawab malik ED : राष्ट्रवादीचे मोर्चे ईडी विरोधात? की चौकशीत “कोणाचे” नाव घेऊ नये म्हणून नवाब मलिकांवर दबावासाठी…??


नाशिक : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी तसेच अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशी आणि तपासाच्या फेऱ्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सापडले. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे काढून निदर्शने केले नाहीत. तर फक्त नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मात्र राष्ट्रवादीने मोर्चे काढून निदर्शने केली आहेत. Nawab Malik ED: NCP’s march against ED? Or to put pressure on Nawab Malik not to take “whose” name in interrogation … ??

या मोर्चाचे रिपोर्टिंग मराठी माध्यमे जोरजोरात करत आहेत. राष्ट्रवादीने ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्याच्या निषेधार्थ हे मोर्चे आहेत, असे राष्ट्रवादीने सांगितले आहे.

पण तरी देखील या मोर्चाचे नेमके “राजकीय रहस्य” काय आहे??, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही!! हे मोर्चे ईडीच्या कारवाई विरोधात आहेत की नवाब मलिक यांनी ईडी चौकशी दरम्यान “कोणाचे” नाव घेऊ नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी काढण्यात येत आहेत??, हा तो सवाल आहे.

नवाब मलिक यांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी का सुरू झाली? त्याचे राजकीय रहस्य काय आहे?, तर कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतले म्हणून ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे. ज्याअर्थी इक्‍बाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यामुळे मालिकांची चौकशी सुरू आहे त्याअर्थी नवाब मलिक हे या चौकशीदरम्यान नेमके “कोणाचे” नाव घेणार आहेत…?? कोणाचे नाव घेतल्याने “कोण” अडचणीत येणार आहे आणि म्हणून त्यांनी “कोणाचे” नाव घेऊ नये, यासाठी मोर्चे काढून त्यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे का…?? या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते “आम्ही साहेबांबरोबर” अशा टोप्या घालून सामील झाले आहेत.


भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??


ईडीने चौकशीसाठी नवाब मलिक यांना ताब्यात घेतलेले असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते “कोणत्या” साहेबांबरोबर आहेत?? हा सवाल या निमित्ताने तयार झाला आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीचा मोर्चा ईडीच्या कारवाई विरुद्ध आहे की या चौकशीत नवाब मलिक यांनी “कोणाचे” नाव घेऊन यासाठी दबाव तयार करण्यासाठी काढण्यात आला आहे…??, हा सवाल लाख मोलाचा ठरत आहे.

– मोर्चाचे दुसरे रहस्य काय??

आत्तापर्यंत ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या आणि अटकेच्या फेऱ्यात छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, पवार कुटुंबीय, अनिल देशमुख हे राष्ट्रवादीचे नेते सापडले होते आणि आहेत. इतकेच काय पण अजित पवारांच्या बहिणींच्या घरावर ईडीने छापे घातले होते. 184 कोटी रुपयांचा हिशोब त्यांच्याकडे मागण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक तिखट प्रतिक्रिया जरुर व्यक्त केल्या, पण मोर्चे काढले नाहीत. आज मात्र नवाब मलिक यांना ईडीने फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादीने मोर्चे काढले!! याचे राजकीय रहस्य कशात दडले आहे…?? नवाब मलिक या चौकशीत नेमके कोणाचे नाव घेतील याची भिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटत आहे…??

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चामध्ये अनेकांनी डोक्यावर टोप्या घातल्या आहेत. “आम्ही साहेबांबरोबर”, असे त्यावर लिहिले आहे. ईडीने राष्ट्रवादीच्या साहेबांना नव्हे, तर नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांची 5 तासांहून अधिक चौकशी सुरू आहे पण दुपारी 1.00 वाजेपर्यंत त्यांच्या अटकेची बातमी आलेली नव्हती. तरी देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते डोक्यावर “आम्ही साहेबांबरोबर” अशा टोप्या घालून मोर्चा काढून निदर्शने करत आहेत. याचा अर्थ नेमका काय काढायचा…?? राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेमके कोणत्या “साहेबांबरोबर” आहेत…?? याचे उत्तर अजून मिळालेले नाही…!!

Nawab Malik ED : NCP’s march against ED? Or to put pressure on Nawab Malik not to take “whose” name in interrogation … ??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*