Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या विरोधात संघर्ष टोकाला नेऊन शिवसेना फसली की उसळली…??


मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचा हट्ट धरणार्‍या राणा दांपत्याशी संघर्ष टोकाला नेऊन शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर उसळी घेतली की शिवसेना फसली…??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राणा दाम्पत्याला सन्मानाने मातोश्रीवर बोलावून त्यांचा सत्कार केला असता तर पुन्हा दांपत्य “झिरो” झाले असते आणि मुख्यमंत्री “हिरो” ठरले असते अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात विशेषत: शिवसेनेच्या वर्तुळात आहे. Navneet Rana: Shiv Sena failed or bounced back by ending the struggle against Rana couple …??

पण त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना आपली निष्ठा दाखवण्यासाठी शिवसैनिकांमध्ये जी चढाओढ लागली आहे त्यामुळे शिवसेना अधिक संघटित झाली असाही सूर दुसरीकडे उमटताना दिसत आहे.

त्याचबरोबर आज जरी राणा दाम्पत्य भाजप पुरस्कृत हनुमान चालीसा आंदोलन करत असले तरी मूळात नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार होत्या हे मुख्यमंत्री विसरले नाहीत. त्याचबरोबर नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईला येण्यापूर्वी चारच दिवस आधी शरद पवारांचा अमरावती दौरा झाला. त्यात नवनीत राणा यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाची स्तुती केली होती, ही देखील महत्त्वाची बाब मुख्यमंत्र्यांनी कानाआड केलेली नाही. त्यामुळे राणा दांपत्याला विरोध करून मुख्यमंत्री एकाच वेळी भाजपला उघडपणे आणि राष्ट्रवादीला छुप्या पद्धतीने शिवसेनेची ताकद दाखवून देत आहेत, अशी तिसरी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शिवसैनिक गेले तीन दिवस तो मातोश्री भोवती पहारा ठेवून आहेत त्यातून बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेची शिवसेना अजून जागृत आहे. शिवसैनिक मातोश्रीवर बाळासाहेबांनंतरही तेवढेच प्रेम करतात हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. त्यामुळे बाकीच्या राजकीय पक्षांची चर्चा काय चालली आहे यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी राणा दांपत्याशी संघर्ष टोकाला नेऊन स्वतःभोवतीच शिवसेनेचा किल्ला मजबूत झाले असे यातून दिसते आहे.



राणा दाम्प्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेने मातोश्रीवर जागता पहारा देण्यास सुरुवात केली आहे. राणा दाम्पत्य मुंबईत पोहोचणार नाही, अशी काळजी घेतल्यानंतरही मातोश्रीच्या अंगणापर्यंत जाऊन ते पोहोचले. त्यामुळे मातोश्रीच्या समोर आपण हनुमान चालिसाचे पठण करणार यावर राणा दाम्पत्य ठाम असून शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांच्या कृतीमुळे उद्धव ठाकरे कमजोर बनले असून राणा दाम्पत्याला  मातोश्रीत सन्मानाने बोलावून त्यांना हनुमान चालिसा बोलण्यास परवानगी दिली असती, तर मुख्यमंत्री हिरो आणि राणा दाम्पत्य झिरो बनले असते. पण राजकारणाच्या सारीपटावरील ही खेळी शिवसेनेला खेळता आली नाही आणि दोन व्यक्तींसाठी आपली असली नसलेली पतही त्यांनी घालवून टाकली, अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

राणा दांपत्य अमरावतीतून बाहेर पडू नये म्हणून तेथील रेल्वे स्थानकावर स्थानिक शिवसेनेचे नेते तैनात झाले. पण त्यानंतरही ते मुंबईत पोहोचले. त्यांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक तैनात झाले होते. तरीही राणा दाम्पत्य खार येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. परंतु राणा दाम्पत्य मातोश्रीवर येणार असल्याने सकाळपासून या परिसरात शिवसेना नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत ही गर्दी होती. खुद्द पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या ठिकाणी येऊन शिवसैनिकांचे मनोधैर्य उंचावले. यावेळी त्यांनी तुम्ही सकाळपासून खूप थांबलात, आता घरी जा असे सांगत घरी जाण्याचे आवाहन केले.

शिवसेनेला भविष्यात धोकादायक ठरू शकते

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राणा दाम्पत्य हनुमान चालिसाच पठण  करणार ना? नमाज तर नाही ना! ज्या मातोश्रीत बाळासाहेबांनी मुस्लिमाला नमाज करायची परवानगी दिली होती, तिथे हनुमान चालिसा वाचू द्यायला काय हरकत आहे?, अशी प्रतिक्रिया ऐकू येत होती.  शिवसैनिकांनी, राज्यात आपलेच पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदी असल्याने संयमाने घ्यायला हवे होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी, कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता राणा दाम्पत्यला मातोश्रीच्या बाळासाहेबांच्या आसनाजवळ हनुमान चालिसा बोलण्याची व्यवस्था करून दिली असती, तर मुख्यमंत्र्यांच्या या खेळीने त्यांना राणा दाम्पत्याच्या राजकीय खेळीवर मात करता आली असती. परंतु शिवसैनिकांनी त्यांचे आव्हान स्वीकारून एक प्रकारे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री यांच्यासह शिवसेनेला कमजोर करत त्यांच्यापुढील अडचणी ठेवल्या अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण त्यापलिकडे जात मुंबईतील शिवसेना मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने एकवटून घेतली ही वस्तुस्थिती देखील नाकारता येणार नाही.

Navneet Rana : Shiv Sena failed or bounced back by ending the struggle against Rana couple …??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात