उत्तर प्रदेशासह 4 राज्ये जिंकल्यानंतर भाजपमध्येच नाही, तर संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेची, योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजरची आणि त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे. याचा नेमका अर्थ महाराष्ट्रातल्या जाणत्यांना कळतोय का…?? असा प्रश्न तयार झाला आहे. Modi – Yogi – Fadanavis: Modi – Yogi followed by Fadnavis nationwide discussion; Do you know the meaning of “knowers” … ??
भाजपने नॅरेटिव्ह सेट केल्याप्रमाणे चार राज्ये जिंकल्यानंतर हा विजय मोदींचा आहे. मोदी लाटेचा आहे, अशी भाषा वापरत सगळे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊन टाकले. ते स्वाभाविक होते. मोदी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये फिरले होते त्या अनुषंगाने त्यांना श्रेय देणे हे इतरांच्या कितीही पोटात दुखले तरी त्यात गैर काही नव्हते.
मोदींपाठोपाठ उत्तर प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण देशात योगी आदित्यनाथ यांची चर्चा रंगली ती त्यांच्या “बुलडोजर बाबा” या इमेज मुळे. वास्तविक अखिलेश यादव यांनी”बुलडोजर बाबा” हे दूषण योगी आदित्यनाथांना दिले, पण “बुलडोजर बाबा” हे दूषण त्यांच्यासाठी “भूषण” ठरले…!! त्यामुळे “यूपी मे का बा” ने सुरुवात झालेली उत्तर प्रदेशची निवडणूक “यूपी मे बाबा” पर्यंत येऊन ठेपली आणि सगळ्यात शेवटी “बुलडोजर बाबांना” विजय देऊन गेली…!!
योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर बाबांची अशी “इमेज चर्चा” रंगत असताना संपूर्ण देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात मात्र चर्चा रंगली ती देवेंद्र फडणवीस यांची. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात आपल्या राजकीय कौशल्याने बहुमत आणून दाखवले. त्याआधी त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला आणि ते गोव्याला निघून गेले. त्यामुळे फडणवीसांची चर्चा महाराष्ट्रात रंगली होती, पण गोव्यातल्या विजयानंतर ती चर्चा मोदी आणि योगी यांच्या पाठोपाठ फडणवीसांची व्हायला लागली…!! हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. फडणवीसांनी बिहारमध्ये भाजपला एक नंबर करून दाखवले आहेच. त्यानंतर मिशन गोवा ही सक्सेसफुल केले आहे. त्यामुळे आपोआपच फडणवीसांचे नेतृत्व हे निवडणुका जिंकण्याचे रसायन आहे हे एस्टॅब्लिश व्हायला लागले आहे. आणि त्या पलिकडे जात फडणवीसांनी आता पुढचे “मिशन मुंबई” हे आजच्या सत्काराच्या निमित्ताने जाहीर करून आपल्या भोवतीची चर्चा महाराष्ट्रात आणि देशात कशी गडद होईल, याची व्यवस्थाच करून टाकली आहे.
पंतप्रधान मोदींनी पुण्याच्या मेट्रो च्या उद्घाटनात कथित “जाणते राजे” शरद पवार यांच्या टीकेची दखलही घेतली नाही. त्यांना अनुल्लेखाने मारले. बाकीच्या भाजपच्या नेत्यांनी टोमणे मारले तरी मोदींनी संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमात पवार यांचे नावही घेतले नाही. हा “राजकीय मेसेज” भाजप कार्यकर्त्यांसाठी पुरेसा होता. त्यानंतर पेन ड्राईव्ह बॉम्ब, गोव्यातला भाजपचा बहुमताचा विजय यामुळे फडणवीसांची प्रतिमा नुसतीच उंचावली नाही, तर ती आता “कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला” इथपर्यंत येऊन ठेपली आहे…!!
महाराष्ट्राच्या वाघाने म्याव म्याव केले, अशी शिवसेनेची प्रतिमा आमदार नितेश राणे ठळक करत चालले आहेत. त्यानंतर वाघाची “रिप्लेसमेंट” फडणवीस यांच्या रूपाने भाजपला मिळाल्याचे दिसते आहे…!! फडणवीसांनी देखील आपली वाघाची प्रतिमा अधिक गडद करण्याच्या दृष्टीने पुढचे “मिशन मुंबई” जाहीर करून पुढच्या पेन ड्राईव्ह आमची बॉम्बची तयारी चालवल्याचे दिसून येत आहे.
तिकडे उत्तर प्रदेशा कालच जिंकल्यानंतर मोदी आज “मिशन गुजरात”वर आहेत. तर गोवा जिंकल्यानंतर फडणवीस “मिशन महाराष्ट्र”वर पुन्हा रुजू झाले आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जाणत्यांना कळतोय का…?? “हम तयार है” असे स्वतःच्या घरात बसून मराठी पत्रकारांच्या परिषदेत म्हणून तयारी होते का…??, हा खरा प्रश्न आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App