राज्यभरातल्या लढाईसाठी राऊत + जरांगेंना केलेय “बफर”; फक्त बारामती वाचवण्यासाठी होतोय वापर!!

नाशिक : मनोज जरांगेंच्या उर्मट आणि महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या धमकी भरल्या भाषेच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने गंभीर दखल घेऊन त्यांच्या आंदोलनातल्या मास्टरमाईंडची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशी लावली आहे. त्यावर अनेक बाजूंनी क्रिया – प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये संजय राऊत आणि मनोज जरांगे यांची भाषा आजही समान आहे. दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेटवर ठेवले आहे. Mastermind using jarange raut as buffer in maharashtra, to save baramati

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची वक्तव्ये आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा बारकाईने आढावा घेतला, तर एक बाब स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे राऊत + जरांगे यांना “बफर” करून फक्त बारामती वाचवण्याचे उद्योग सुरू आहेत!! या सगळ्याचा नेमका अर्थ समजून घेण्याची गरज आहे.

मनोज जरांगे आणि संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातल्या लढाईमध्ये उतरवून आपण बारामती वाचवण्यासाठी “मोकळे” राहायचे आणि बारामतीतच आपली लढाई पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करायची हा मास्टरमाईंडचा खरा डाव आहे.

यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आक्रमकपणे समोर आले असले, तरी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अजून तितकेसे आक्रमकपणे समोर आलेले नाहीत ही बाब या लढाईत अधोरेखित केली पाहिजे.

कारण अजित पवारांनी देखील आपली राजकीय लढाई बारामतीतच कॉन्सन्ट्रेट केलेली दिसत आहे. अजित पवारांनी बारामतीची लढाई जिंकली आणि महायुतीच्या पारड्यात बारामतीचा खासदार टाकला, तर आणि तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्यांच्यावरचा विश्वास टिकून राहणार आहे. अन्यथा कोणत्याही कारणाने अजित पवार बारामतीची लढाई जिंकू शकले नाहीत, तर मोदी आणि शाह यांच्यासाठी अजित पवार यांची उपयुक्तता संपेल आणि अजित पवार खऱ्या अर्थाने अडचणीत येऊ शकतील, ही बाब जास्त अधोरेखित करून ठेवली पाहिजे.

कुटुंबातलीच खरी – खोटी लढाई घातक

या पार्श्वभूमीवर काका आणि पुतण्यांमध्ये बारामतीची लढाई अत्यंत महत्त्वाची आहे. किंबहुना दोघांच्याही खऱ्या राजकीय आणि कौटुंबिक अस्तित्वाची ही लढाई आहे. भले ती कौटुंबिक पातळीवर खरी – खोटी लढाई असेल किंवा बारामतीचा खासदार कोणीतरी पवार कुटुंबातलाच होणार असेल, तरी देखील जो कोणी खासदार होईल, त्याच्या विरुद्ध बाजूचे कुटुंब राजकारणातून उठणार आहे. पराभूत होणाऱ्या उमेदवाराला फार मोठी राजकीय किंमत चुकवावी लागणार आहे!! या अर्थाने बारामतीची लढाई सोपी नाही.

पूर्वी बारामतीची लढाई संपूर्ण पवार कुटुंब एकजुटीने लढत असल्याने ती खूप “कॅज्युअली” घेतली जात असे, पण आता ते शक्य नाही म्हणूनच त्या लढाईवरच कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी राऊत आणि जरांगे यांना संपूर्ण राज्यभर “बफर” म्हणून वापरत त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढायला पाठवायचे. दोघांविरुद्ध जरांगे आणि राऊतांकडून रान उठवत राहायचे आणि आपण बारामतीच्या लढाईवर कॉन्सन्ट्रेट करायचे हा मास्टरमाईंडचा डाव आहे.

शिंदे – फडणवीस सरकारने नेमलेल्या स्पेशल टीम कडून टीमच्या चौकशीतून मनोज जरांगे यांच्या आंदोलनातले “सत्य” बाहेर येईलच, पण ते “सत्य” आजही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहिती आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीतून फार मोठा “वेगळा प्रकाश” त्या “सत्यावर” पडेल, असे अजिबात मानायचे कारण नाही. पण त्याची अधिकृतता विधानसभेच्या पटलावर आली की मास्टरमाईंड अधिकृतरित्या “एक्सपोज” होईल. पण तोपर्यंत बारामतीची लढाई निर्णायक अवस्थेत पोहोचलेली असेल, कारण एसआयटी चौकशी सुरू करून तिचा अहवाल किंवा तिचा निष्कर्ष लगेच समोर येणे शक्य नाही. त्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे याची जाणीव दोन्ही बाजूंना आहे. त्यामुळे एसआयटी चौकशीच्या राजकीय हत्याराचा वापर दोन्ही बाजूंनी होणार आहे.

अजित पवारांची विश्वासार्हता पणाला

मधल्या मध्ये या प्रक्रियेत राज्याची लढाई जरांगे आणि राऊत लढत राहतील आणि बारामतीच्या लढाईसाठी आपण “मोकळे” राहू हा मास्टरमाईंडचा होरा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर बारामतीतल्या लढाईचे हे खरे आव्हान आहे. त्यांची विश्वासार्हता पणाला लागणार आहे. मोदी – शाहांच्या विश्वासाला अजित पवार पात्र ठरले, तर त्यांचे राजकीय भवितव्य “बाहेर” असेल, अन्यथा तो मार्ग ऑर्थर रोड जेल कडे जाणे अवघड नाही!! त्यामुळे स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मनोज जरांगे पाटलांनी जरी उर्मट भाषा वापरून देवेंद्र फडणवीस यांनाच तुरुंगात टाकावे लागेल, अशी धमकी दिली असली, तरी प्रत्यक्षात जेल कडे जाणारा मार्ग वेगळाच नेत्यासाठी उघडला जाऊ शकेल, ही आजची वस्तुस्थिती आहे. पण एकूण संजय राऊत आणि मनोज जरांगे यांचा “बफर” करून त्यांना राज्यभर लढवत ठेवून आपण बारामती वाचवण्यासाठी “मोकळे” राहण्याचा मास्टरमाईंडचा होरा आहे, हे मात्र निश्चित!!

Mastermind using jarange raut as buffer in maharashtra, to save baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात