युरेका… युरेका…!! अखेर सापडला. संपूर्ण देशात धुंडाळून शेवटी तो मुंबईतच सापडला. मोदींच्या पराभवासाठी मुंबईत “बंगाली स्टार” सापडला… त्या बंगाली स्टारने आपल्या बंगाली बोलीत बॉलिवूडी लिबरल्सचे मन जिंकले आणि काँग्रेसला वगळून स्वतःचे वैचारिक वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न केला…!! Mamata : Bollywood’s party animal
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रूपाने बॉलिवूडी लिबरल्सना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी नवा “बंगाली स्टार” सापडला आहे. आज मुंबईत सिव्हिल सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्त ममता बॅनर्जी यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बंगाली वळणाची हिंदी बोलत बॉलिवुडकरांचे मन जिंकले. महेश भट, शाहरुख खान यांना भाजप राजवटीने “व्हिक्टिम” केले, असा आरोप त्यांनी केला. भाजप अत्यंत क्रूर आणि हुकुमशाहीवादी पक्ष आहे. लोकशाहीशी त्याचा काहीही संबंध नाही. त्या पक्षाची राजवट उखडून टाकण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्याचा निर्धार मी केला आहे, असे जबरदस्त भाषण ममता बॅनर्जी यांनी सिविल सोसायटी पुढे केले. शाहरुख खान आणि महेश भट यांच्या व्हिक्टिम कार्ड विषयी बोलून त्यांनी बॉलिवूडकरांच्या भावनांना हात घातला. त्यामुळे आज त्या बॉलिवूडकरांच्या गळ्यातल्या ताईत बनल्या आहेत.
त्यांच्या कार्यक्रमाला बॉलीवूड लिबरल्सनी गर्दी केली होती. यामध्ये मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश शफी पारकर, अभय ठिपसे, महेश भट, स्वरा भास्कर, कोंकणा सेन शर्मा, शत्रुघ्न सिन्हा, मेधा पाटकर, तिस्ता सेटलवाड, शोभा डे हे सर्व बॉलिवुड मधल्या पेज थ्री चे “पार्टी ऍनिमल” होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता पेज थ्री वर जबरदस्त वाढलेली दिसली…!!
इथून पुढच्या काळात ममता बॅनर्जी या बॉलिवूड लिबरल्सच्या “स्टार” असल्याने देशभरात त्यांचा झंझावात आता वेगळ्याच वेगाने सुरू होणार आहे. आत्तापर्यंत हे बॉलिवूडी लिबरल्स काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भोवती जमावडा करायचे. आता त्यांनी नवा “बंगाली स्टार” शोधून काढून त्याच्या भोवती जमावडा सुरू केला आहे. आज त्याची ही केवळ झलक दिसली आहे. 2024 पर्यंत अनेक झलकी दिसणार आहेत…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App