अभ्यास करण्यासाठी काही बाबी आवश्यकच आहेत , अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन तासभर तरी मला बोलावू नका असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही. Life Skills: Pay attention while studying
अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नये किंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये.
अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे. मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत, अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अति स्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल.
अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने, वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे. घाणेरड्या व अश्लीाल विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे. लहान-लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App