लाईफ स्किल्स  : जीवाचा कान देवून ऐका, दुसऱ्याचे ऐकून घेणे म्हणजे आपल्या विरोधी मत ऐकण्याची सहनशीलता अंगी बाळगणे

चांगला श्रोता होण्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टी आगत्याने करायच्या असतात. त्यासाठी आधी दुसर्याशच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करावे. दुसर्यालशी महत्वाचे संभाषण करताना आपला मोबाईल फोन वाजणार नाही याची दक्षता घ्यावी. भरकटणारे मन हे लक्षपूर्वक ऐकण्यात मोठाच अडथळा निर्माण करते. त्याला प्रयत्नपूर्वक वेसण घालावी लागते. Life Skills: Listen carefully, listen to others, be patient with your opinions

शारीरिक भाषेवरून व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत आहे की नाही हे समजून येते. डोळ्याला डोळा भिडवून ऐकणारा तुमच्या बोलण्यात रस घेत असतो, तर तुम्ही बोलत असताना इकडे तिकडे बघत क्वचित जांभई देत, पेन किंवा तत्सम वस्तूशी चाळे करत ऐकणारा बळेबळेच तुमचे बोलणे ऐकत आहे असे समजावे. माणसाचा दृष्टीकोन त्याच्या अशा हालचालीवरून लक्षात येतो. सकारात्मक दृष्टीकोनातून दुसर्यााचे बोलणे ऐकल्यास आपोआपच ते शारीरिक हालचालींमध्येही उमटते. मुद्दाम मग शारीरिक भाषेकडे लक्ष देण्याची गरजही भासणार नाही. असे ऐकणे म्हणजे त्यांच्या विचार स्वातंत्र्याचा मान राखणे. दुसर्यााचे ऐकून घेणे म्हणजे आपल्या विरोधात असलेले मत ऐकण्याची सहनशीलता अंगी बाळगणे. दुसर्यारचे ऐकून घेणे व कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वाहन चालवताना आजूबाजूचे आवाज लक्षपूर्वक ऐकावे लागतात.

रेल्वेस्थानकावरील ध्वनीक्षेपकावरून दिल्या जाणार्याू सूचनाही जीवाचा कान करून ऐकाव्या लागतात. ऐकताना मनात दुसरा कोणताही विचार आणला नाही तरच लक्ष केंद्रित होते. कामाच्या ठिकाणी, मिटींग्जमध्येही हेच लागू पडते. मिटींग चालू असताना चित्त भरकटलेले असेल तर दुसरा काय सांगतो आहे ते डोक्यात शिरणार नाही. लक्षपूर्वक ऐकणे म्हणजे आजूबाजूच्या निरनिराळ्या आवाजातील हवा तो नेमका आवाज निवडून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. कोणत्या आवाजाकडे लक्ष देणे हे त्या त्या वेळच्या गरजेवर अवलंबून आहे. दुसर्यासचे म्हणणे ऐकून घेणे म्हणजे स्वत:चे महत्व कमी करून घेणे अशी काहींची समजूत असते. ती अर्थातच चुकीची आहे. दुसर्यामचे बोलणे लक्षपूर्वक ऐकणे हा सौजन्याचाच एक भाग आहे.

Life Skills : Listen carefully, listen to others, be patient with your opinions

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub