डाव्या – उजव्या मेंदूची कामे फार मोलाची

प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच. इतर प्राण्यांच्या मेंदूच्या मूलभूत घडणीखेरीज काही नवे थर मानवी मेंदूत आहेत. मेंदूरचनेत हे थर स्पष्टपणे दिसून येतात. मेंदूच्या रचनेत लहान मेंदू व मोठा मेंदू ही सामान्यपणे प्रचलित विभागणी आहे. मात्र मानसशास्त्राच्या दृष्टीने मेंदूचे तीन विभाग धरलेले आहेत. Left – Right brain functions are very important

मूळ मेंदू म्हणजे सर्वात खालचा, चेतारज्जूशी जोडलेला देठाचा भाग. मध्यमेंदू म्हणजे मधला थर तर मुख्यमेंदू म्हणजे वरचा थर. मूळ मेंदू अगदी मूलभूत शारीरिक कामांचे नियंत्रण करतो. यात श्वसन, रक्ताभिसरण, शुध्दी किंवा जाणीव, इत्यादी प्राणिजीवनाला लागणारी प्राथमिक कामे येतात. मूळ मेंदूला इजा झाल्यास बेशुध्दी, श्वसन व हृदयक्रिया थांबणे आणि मृत्यू येणे संभवते. मध्यमेंदू हा भावना, वासना नियंत्रित करतो. मुख्यमेंदू हा मध्यमेंदूच्या वर, पुढे, मागे, बाजूला पसरलेला असतो. याचे डावा-उजवा असे दोन स्पष्ट भाग असतात. या दोन्ही भागांचे काम जरा वेगळे असते. डावा भाग विचारशक्ती, बोलणे, भाषा, तंत्रज्ञान, इत्यादी प्रगत कामे पार पडतो. उजवा भाग संगीत,नृत्य, भावना, जाणिवा, आध्यात्मिक उर्मी आणि अवकाशज्ञान इत्यादी जबाबदा-या सांभाळतो.

यातही मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो. मेंदूचा मानेकडचा मागचा भाग हा दृष्टीज्ञानाशी संबंधित आहे. कानाकडचा भाग ध्वनिज्ञान आणि वासाचे ज्ञान सांभाळतो. वरचा मध्यभाग शरीराची हालचाल आणि संवेदना ज्ञान सांभाळतो. मेंदूचे काम कोटयवधी मेंदूपेशींमार्फत चालते. या मेंदूपेशींना असंख्य टोके असतात. ही टोके आजूबाजूच्या पेशींच्या टोकांना जोडलेली असतात. या जोडणीचे स्वरूप रासायनिक , विद्युत असे असते. एका पेशीतून निर्माण झालेला संदेश दुस-या पेशीपर्यंत असा पोहोचतो यात टोकांमध्ये असलेले रासायनिक माध्यम आणि त्यातून जाणारा विद्युत संदेश यांचा मुख्य वाटा असतो. या रासायनिक पदार्थाचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले किंवा विद्युतसंदेशांमध्ये बिघाड झाला तर मेंदूचे कामकाज बिघडते. अल्झायमरच्या आजारात असाच बिघाड होतो. एवढे आता माहीत असले तरी मन व मानसिक आजार यांबद्दल शास्त्राला अजूनही पुष्कळ कळायचे शिल्लक आहे.

Left – Right brain functions are very important

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात