यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. त्यामुले अनेकदा यश मिळूनही लोक नाराज होतात कारण त्यांना यश म्हणजे नेमके काय हेच माहिती नसते. असे लोक यश काय आहे हे जाणण्याचाही प्रयत्न करत नाहीत.Learn to work with any team spirit
त्यामुळे अनेकदा त्यांच्या वाटेला निराशा येते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते. हे कौशल्य आपल्या आतून येते. यश मिळविण्यासाठी या गोष्टींची गरज असते.
अनुकूल वातावरण. शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही. इतरांबरोबर काम करताना सुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते.
तुमच्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका. आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने उत्सवाचे, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे. जर सगळे लक्ष फक्त उत्पादन आणि निव्वळ नफा यावर असेल तर काहीच होणार नाही. लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे.
कर्माच्या फळामध्ये गुंतून न रहाणे हेच भगवद्गीतेचे सार आहे. जर एखाद्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असाल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सांभाळून घेऊ शकता. कर्माच्या या कौशल्याला योग म्हणतात. योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा-आत्मविश्वासात, लीनता-नम्रतेत, परावलंबित्व-परस्परावलंबनाची जाणीव होण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात,एकत्वाची भावना निर्माण होण्यात परिवर्तीत होते.
काम करत असताना जर सगळे लक्ष जर फक्त अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही. फक्त जे काम करत आहात त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने शंभर टक्के द्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App