विख्यात मनोविकासतज्ञ गार्डनर यांच्या मते मानवाला सात प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. ज्या व्यक्तींचे भाषेवर उत्तम प्रभुत्व असते त्यांची लिंग्विस्टिक बुद्धिमत्ता चांगली असते. या लोकांना शब्दांमधे आपले विचार मांडणे छान जमते व लिहिण्यात वाचण्यात हे प्रभावी असतात. शालेय यशासाठी साहजिकच ही वर्बल बुद्धिमत्ता आवश्यक असते. तार्किक बुद्धिमत्ता ही देखील शालेय यशासाठी महत्त्वपूर्ण असते. या लोकांची तर्कशक्ती उत्तम असते. त्यामुळे समस्या निर्मुलनात हे लोक हुशार असतात. Learn the seven types of intelligence
ज्या लोकांचे गणित चांगले असते त्यांची ही बुद्धिमत्ता चांगली असते. शास्त्रीय क्षेत्रांमधे काम करणाऱ्यांची ही बुद्धिमत्ता चांगली असावी लागते. नजरेतून दिसणाऱ्या गोष्टीतून पटकन शिकण्याची क्षमता विझ्युअल बुद्धिमत्ता चांगली असणाऱ्यांकडे असते. वैयक्तिक बुद्धिमत्तेला म्हणतात पर्सनल इंटेलिजन्स. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यापूर्वी त्या गोष्टीचे आपल्याला काय महत्त्व आहे. त्याने आपल्याला कसा उपयोग होणार आहे. ज्ञानात कशा प्रकारची भर पडणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करतात.
इतरांशी उत्तम संवाद साधण्याची कला असणाऱ्या लोकांचे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स चांगले असते. इतर लोकांबरोबर संपर्क जोडून एकत्रितपणे काम करण्यात या लोकांना रस असतो व इतरांच्या मनातील जाणून घेण्यात त्याच्या इच्छा अपेक्षा काय असतील हे ओळखण्यात हुशार असतात. सेल्समन माकेर्टिंगमधे काम करणाऱ्या लोकांसाठी आवश्यक अशी ही बुद्धिमत्ता आहे. शारीरिक बुद्धिमत्ता असणाऱ्यांना वातावणाबरोबर कसा संपर्क साधावा हे छान येते. हाताने एखादी गोष्ट करून हे लोक पटकन शिकतात. तसंच खेळ नाट्य नृत्य या गोष्टींमधे ते निपूण असतात. सांगीतिक बुद्धिमत्ता असलेली मुले सतत ताल धरतात, गुणगुणतात. त्यांना इतरांना न ऐकू येणारे नाद आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येत असतात ही मुले उत्तम श्रोता असतात. आपल्यामधे कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता अधिक आहे यावरून आपण कोणत्या कामात यशस्वी होऊ शकतो याचा आढावा आपल्याला घेता येतो. तर यापैकी तुम्ही कोणत्या क्षेत्रात हुषार आहात ते पाहून आपल्यामधे कोणती बुद्धिमत्ता अधिक जम धरून आहे हे पाहा. आपल्यामधे या सर्व बुद्धिमत्तांचे मिक्स्चर असते. थोड्याफार प्रमाणात आपल्यामधे या निरनिराळ्या बुद्धिमत्ता असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App