चंद्राच्या ध्रुवीय क्षेत्रात प्रकाशापासून दूर असलेल्या अतिशीत भागात गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याच्या निरीक्षणावर शास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले. यासाठी दहा वर्षांपूर्वी अवकाशात उड्डाण केलेल्या भारताच्या चांद्रयान-1 ने गोळा केलेल्या माहितीचा उपयोग करण्यात आल्याचे अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सांगितले आहे. Large deposits of ice on the moon
चंद्राच्या पृष्ठभागावर काही मिलिमीटर खोल अंतरावरच बर्फाचे अस्तित्च सिद्ध झाल्याने भविष्यातील मोहिमांदरम्यान त्याचा वापर करणे शक्यं असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. चंद्राच्या पृष्ठभागाखाली काही अंतरावर पाण्याचे साठे आढळले असले तरी, त्याचा वापर करण्यापेक्षा या बर्फाचा वापर करणे अधिक सोपे असल्याचेही ते म्हणाले.
ध्रुवीय क्षेत्रात आढलेले बर्फाचे साठे हे विखुरलेल्या अवस्थेत असून, प्राचीन काळापासून ते तसेच असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. याबाबतचा अहवाल पीएनएएस या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आढळलेला बहुतांशी बर्फ हा केवळ तेथील दऱ्यांमध्ये साचलेला आहे, तर उत्तर ध्रुवावरील बर्फ हा विस्तृत भूभागावर विखुरला आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी नासाने मून मिनरॉलॉजी मॅपर (एम 3) या यंत्राचा वापर केला. चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने हे यंत्र 2008 मध्ये अवकाशात पाठविले होते.
या नव्या संशोधनामुळे चंद्राच्या अभ्यायासाठी मोठा फायदा होणार आहे. आता या बर्फाचा वापर कसा करता येईल याचा शोध शास्त्रज्ञ घेणार आहेत. त्यामळे अभ्यासकांसाठी या नव्या संशोधनामुळे नवी कवाडे खुली झाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App