नातं असणं म्हणजेच संवादाची शक्यता निर्माण होणं. नात्यांच्याच माध्यमातून निसर्गप्रेमी निसर्गाशी, ईश्वर मानणारे ईश्वराशी तर मानवतावादी सर्वांशी संवाद साधत असतात. नाती माणसाला घडवतात, की माणूस त्यांना हा वादाचा मुद्दा आहे. पण कोणतंही नातं जोपर्यंत आहे तोपर्यंतच असतं. Knowing the energy of the relationship, the relationship is what makes a person
असणारं नातं का तुटतं याचा सामान्य नियम नसतो. रक्ताची नातीही याला अपवाद नसतात. जन्म जन्मांतरीचे नाते बोलण्यापुरते ठीक असते. प्रत्यक्षात माणसांची नाती बऱ्याचदा विस्कटतात, गोठतात, उसवतात, नकळत संपतात, मुद्दामहून संपवली जातात. नातं जुळणं स्वाभाविक तसं ते तुटणही स्वाभाविक असतं. जुळलेल्या नात्यातून ऊर्जा निर्माण होते तशीच ती तुटलेल्या किंवा तोडलेल्या नात्यातूनही होते. तीही सकारात्मक असू शकते.
पण ती सहजी स्वीकारली जात नाही. त्यामुळं जुळलेल्यापेक्षा तुटलेल्या नात्यां-चीच चर्चा अधिक होते. त्यात असं व्हायला नको होतं इथपासून बरं झालं संपलं एकदाचं ते नातं अशा टोकाच्या भावना असतात. बऱ्याचदा न जुळणाऱ्या आवडी-निवडी, टोकाचा व्यक्तिवाद, अविश्वास, स्पर्धा, फसवणूक, अन्याय अशी नाती तुटण्याची कारणे असतात. सध्याच्या अतियांत्रिकीकरणाच्या युगात बोअर झाल्यामुळेही नाती तुटू शकतात. पण नातं तुटतं म्हणजे काय होतं? कोणतंही नातं तुटल्यावर त्यातील माणसांचे संबंध संपतातच, पण त्या नात्याची भाषा व संदर्भही संपतात.
कलेची वा विज्ञानाची एक भाषा असते, त्याप्रमाणे प्रत्येक नात्याची एक भाषा असते. त्यातूनच ते नातं व्यक्त होत असतं. आई-मुलाच्या, प्रियकर-प्रेयसीच्या, गुरु-शिष्याच्या नात्यांची भाषा वेगवेगळी असते. त्या विशिष्ट भाषेतूनच त्या नात्यातील भावना व्यक्त कराव्या लागतात. त्या भाषेतूनच त्या नात्यात अभिप्रेत असलेले व्यवहार होऊ शकतात. भाषेप्रमाणेच प्रत्येक नात्याला खास संदर्भही असतो. त्याला शारीरिक, भावनिक, सामाजिक असे अनेक पदर असतात. माणसाला असलेल्या अनेक नात्यांच्या या बहुपदरी जाळ्यातच त्याच्या आयुष्याचा संदर्भ दडलेला असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App