सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे आणि रोज आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही गुणे असे असताता की त्याची भर टाकल्यास आपले व्यक्तीमत्व हळूहळू आकाराला येवू लागते. ते गुण कोणते हे हेरा आणि त्यावर काम करा. तुमच्या वागण्या-बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतित व्हायला हवा. तुम्ही नकारात्मक असाल, किंवा काही कारणांनी नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही. तो व्यक्ती तुम्हाला टाळायचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाहीत. कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहित धरु लागतात. यात तुमचे नुकसान होते. If you don’t have your own opinion, people will assume you, so give a positive opinion
असे म्हटले जाते, की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ग्रुप वाढतो. तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात. तुमच्या ज्ञानात भर पडते. वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा. त्यातून तुमचा वेळ सत्कर्मी लागतो. तुम्ही चांगला श्रोता व्हा. समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होतात. तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App