पिनराई विजयन हे ज्योती बसूंपेक्षा वेगळे कसे ठरले?


पिनराई विजयन यांनी केरळचे अख्खे मंत्रिमंडळ बदलून आपण CPM च्या पॉवरफुल सरचिटणीसापेक्षा अधिक शक्तीशाली झालो आहोत, हे दाखवून दिले आहे. CPM चे सरचिटणीसपद किती प्रभावी असते, हे हरकिशन सिंग सुरजित यांनी १९९६ मध्ये दाखवून दिले होते. त्यांनी ज्योती बसूंचे आयते चालून आलेले पंतप्रधानपद घालवून दाखविले होते… हा इतिहास चाळला म्हणजे विजयन यांच्या राजकीय खेळीचे रहस्य लक्षात येईल. How Pinarayi Vijayan powerful CM than Jyoti Basu who could not dare to defy CPM leadership


केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी नव्या टर्ममध्ये अख्खे मंत्रिमंडळ बदलले. लोकप्रिय आरोग्यमंत्री शैलजा यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविला. आपल्या जावयाला मंत्री करून काँग्रेस संस्कृतीचे पालन केल्याचा आरोप झेलला. याच्या बातम्या मीडियात आल्या. पण यातली खरी राजकीय मेख कोणत्याच मीडियाला फारशी पकडता आलेली नाही किंवा ओळखता आलेली नाही. ती म्हणजे पिनराई विजयन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) असे मुख्यमंत्री ठरले आहेत, की ज्यांनी पक्षाच्या पॉवरफुल अशा सरचिटणीसाच्या राजकीय ताकदीवर किंवा प्रभावावर देखील मात करून दाखविली आहे.

येथे पिनराई विजयन थोडेसे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या जवळपास जाताना दिसतात. किंबहुना ते वेगळेही ठरताना दिसतात. पश्चिम बंगाल आणि ज्योती बसूंच्या मुख्यमंत्रीपदाचा इतिहास थोडासा तपासून पाहिला, तर ज्योती बसू हे प्रत्येक टर्मगणिक पक्षाच्या पॉवरफुल सरचिटणीसापेक्षा प्रभावी ठरलेले मुख्यमंत्री बनत गेल्याचे दिसते. १९७० च्या दशकात अगदी अजय मुखर्जी यांच्याकडून मुख्यमंत्रीपद खेचून घेताना देखील ज्योती बसूंनी जे राजकीय killing instinct दाखविले होते, त्यापेक्षाही ते नंतर प्रभावी ठरत गेल्याचे दिसते. कारण अजय मुखर्जी यांच्याकडून मुख्यमंत्रीपद खेचून घेताना ज्योती बसू पक्षाचे त्यावेळचे प्रभावी नेते आणि सरचिटणीस पी. सुंदरय्या यांना “टाळून” पुढे गेलेले नव्हते. पक्षाच्या पॉलिट ब्यूरोच्या सदस्यांशीही त्यांनी इतरांपेक्षा अधिक जुळवून घेतले होते.



इमएस नंबुद्रीपादांच्या काळात ज्योती बसूंचे पक्षाच्या प़ॉलिट ब्यूरोशी संबंध “बरोबरीचे” होत गेले. पण पश्चिम बंगालमधील सत्ता आणि पक्षातली सत्ता यांच्यातला सत्ता समतोल दोन्ही बाजूंनी नीट संभाळला गेला होता. हा सत्ता समतोल काहीसा हरकिशन सिंग सुरजित यांच्या सरचिटणीसपदाच्या कारकिर्दीत बदलला. ज्योती बसूंचे त्यांच्याशी खटकणारे संबंध नव्हते, पण ते फारसे मधूरही संबंध नव्हते. हरकिशन सिंग सुरजित हे अधिक प्रभावी सरचिटणीस तेव्हा ठरले, जेव्हा त्यांनी ज्योती बसूंची आयती चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी घालविली. १९९६ मध्ये अटल बिहारी वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार पडल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी मिळून ज्योती बसूंचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले होते. पण हरकिशन सिंग सुरजित यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोने ज्योती बसूंना पंतप्रधान होण्यास परवानगी दिली नाही. हा इतिहास आहे.

इथे पश्चिम बंगालचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री ज्योती बसू हे मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्यांच्या पॉलिट ब्यूरोवर मात करण्यात कमी पडले. अर्थात त्यांनी रूढार्थाने पक्षाच्या पॉलिट ब्यूरोला आव्हानही दिले नव्हते हे खरेच.

…आणि इथे पिनराई विजयन ज्योती बसूंपेक्षा वेगळे ठरतात. त्यांनी आपले अख्खे मंत्रिमंडळ बदलताना पक्षाच्या पॉलिट ब्यूरोची परवानगी घेण्याची औपचारिकता दाखविली आहे. पण सध्याचे पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी हे राजकीयदृष्ट्या एवढे दुबळे आहेत, की त्यांनी आपण पिनराई विजयन यांच्या कारभारात हस्तक्षेप करणार नसल्याची घोषणा परस्पर करून टाकली आहे. हे म्हणजे एखाद्याने नुसत्या नमस्काराची किंवा सौजन्याची अपेक्षा केली, तर त्याच्यापुढे संपूर्ण लोटांगण घालण्यासारखे झाले. सीताराम येचुरी यांनी ते केले आहे. अर्थात मार्क्सवाद्यांची सध्याची राजकीय तोळामासा प्रकृती देखील त्याला कारणीभूत आहे हे विसरता कामा नये.

पण ते काहीही असले, तरी पिनराई विजयन यांनी आपण सध्या तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसापेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक प्रभावी आहोत हे दाखवून दिले आहे, हे नक्की…!!

How Pinarayi Vijayan powerful CM than Jyoti Basu who could not dare to defy CPM leadership

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात