तुमच्या प्रत्येकावर लाखो नव्हे तर कोट्यवधी जीव अवलंबून आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण यात तथ्य आहे. कारण मानवी शरीरात कोट्यवधी जीवजंतू असतात. ते तुमच्यावरच अवलंबून असतात. मनुष्यप्राणी सोडून अन्य कुठल्याही प्राण्याला, वनस्पतीला, किड्याला, जंतूला सजीवाला अन्न लागतं पण पैसा, कपडालत्ता काहीही लागत नाही. मनुष्यप्राणी वगळता सर्व जीव उघड्या अंगानेच वावरतात. देवाणघेवाण करण्यासाठी त्यांना पैसा लागत नाही. त्यामुळे पैसा, कपडालत्ता पुरवला नाहीत तरी तुम्ही त्यांचे पोषणकर्ते असता. How many bacteria in human body?
तुमच्या घासातला घास तुम्ही त्यांना पुरवत असता. त्यांच्यापैकी बहुतेकांचा आकार खूपच लहान असतो. त्यांना तुम्ही सूक्ष्मदर्शकातूनच बघू शकता. ते तुमच्या शरीराच्या आत असतात, शरीराच्या बाहेरही असतात. त्यांचे प्रकारही असंख्य आहेत. त्यांच्यापैकी अनेकांची ओळख आपल्याला झालेली नाही; पण लक्षावधी वर्षांपासून ते आपल्याबरोबरच जगत आले आहेत. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यावर या सूक्ष्म जीवाणूंचा शोध आपल्याला लागला. विशेषत: काही संशोधकांनी आजाराची कारणे सूक्ष्मदर्शक यंत्रातून शोधायला सुरूवात केली तेव्हा त्यांचा शोध लागला. ल्युएन हॉकने सूक्ष्मदर्शक तयार केला आणि त्याखाली दिसणार्याो जीवजंतूंमुळं त्याला आधी आश्चर्याचा धक्का बसला आणि मग एकंदरीतच माणसाला हे जग सूक्ष्मजीवांचे आहे हे लक्षात आलं. आपल्याला होणार्या रोगांचे आणि त्यामुळे मरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव आहेत हे डॉक्टरांनी केलेल्या संशोधनामुळे माणसाला समजलं. पटकीचे, विषमज्वराचे जंतू असतात. हगवण जंतूमुळे होते. घटसर्प जंतूमुळे होतो.
एकेक रोग एकेक प्रकारच्या जिवाणूमुळे होतो. एकदा एखादं कारण सापडलं की ते दूर करण्यासाठी काय करता येतील याची आखणी करणं, ती अंमलात आणणं हे मनुष्य प्राण्यालाच शक्य झालेलं आहे. शरीरशास्त्राचा अभ्यास करणार्याआ वैज्ञानिकांच्या मते शरीरातील व बाहेरील जीवजतूंचा आकडा ९० लाख कोटी इतका असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ९० लाख कोटी म्हणजे ९ वर १४ शून्ये. यावरून जीवजंतूची अजब दुनिया किती अफाट आहे याची कल्पना येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App