सरडा कसा काय सहजपणे रंग बदलतो

माणसाला सरड्याच्या बदलत्या रंगाबाबत सतत कुतूहल असते हे मात्र नक्की. नेचर या जगप्रसिद्ध मासिकाने नुकत्याच प्रसिद्द केलेल्या अंकात पॅंथर शॅमिलियान या सर्वांत मोठ्या सरड्याच्या या अनोख्या अविष्कारावर नवा प्रकाश टाकला आहे. प्रामुख्याने पॅंथर शॅमिलियान सरडा हा रंगाने हिरवागार असतो. तो जेव्हा शांतपणे झाडाच्या फांदीवर बसलेला असतो त्यावेळी त्याचा रंग हिरवागार अगदी झाडांच्या पानाप्रमाणेच असतो. How easily a lizard changes color

या हिरव्या रंगामुळे कीटक, किड्यांचे त्याच्याकडे लक्षच जात नाही. आणि पॅंथर शॅमिलियान कीटकाला गट्टम करतो. पण जेव्हा त्याच फांदीवर दुसरा पॅंथर शॅमिलियान येतो त्यावेळी मात्र हा सरडा आपला अविष्कार सुरु करतो.

हा हिरवागार पॅंथर शॅमिलियान चिडतो. आणि रागाच्या भरात त्याचा रंग बघताबघता लाल भडक, पिवळा किंवा नारिंगी होतो. या लाल- पिवळ्या रंगातील पॅंथर शॅमिलियान पाहणे म्हणजे निसर्गप्रेमींसाटी एक पर्वणीच असते. या रंगात पॅंथर शॅमिलियान खूप आक्रमक व खुलून दिसतो. संशोधकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा पॅंथर शॅमिलियान आक्रमक होतो त्यावेळी त्याच्या शरीरावर अगदी कातडीच्या खाली असलेल्या लहानलहान क्रिस्टल्समुळे त्याचा रंग झटकन बदलतो. या क्रिस्टल्सना इरिडोपोअर्स असे म्हणतात.

पॅंथर शॅमिलियान रागावताच त्याच्या शरीरातील हे क्रिस्टल्स लहान किंवा मोठे होतात. म्हणजेच ते आकुंचन पावतात किंवा प्रसरण पावतात. त्यावेळी या क्रिस्टल्समधूल लाल, पिवळे रंग परावर्तित होतात. त्याचाच परिपाक म्हणजे सरड्याचा रंग बदलतो. ही प्रक्रिया अवघ्या दोन मिनिटांत होते.

त्यामुळे काही क्षणातच तो स्वतःचा रंग बदलतो. शरीरात किती क्रिस्टल्स आहेत, शिवाय त्या क्रिस्टल्सचा आकार किती मोठा आहे त्यावर सरड्याच्या रंगाचे प्रमाण अवलंबून असते. जितके मोठे क्रिस्टल तितका रंग अधिक. त्यावेळी झाडावरील दोन्ही पॅंथर शॅमिलियान रंग बदलत असतात. ज्याचा रंग अधिक गडद व लाल आहे तो मोठा सरडा असतो. त्यामुळे नेहमी तोच फांदीवर राहतो. दुसरा सरडा निमूटपणे हार मानून निघून जातो. थोडक्यात सरड्याचे रंग बदलणे हे सोशल बिव्हेरियर असते.

How easily a lizard changes color

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात