कान हे फक्त ध्वनिलहरी ग्रहण करण्याचे एक उपकरण आहे पण प्रत्यक्षात ऐकण्याचे काम मात्र मेंदूच करत असतो. अनेकदा शाळेत किंवा घरात आपल्याला पुढील प्रसंग पहायला मिळतो. एखादे मूल जेव्हा त्याने केलेल्या खोडय़ांची आपल्या पालकांसमोर कबुली देत असते, तेव्हा त्याचे बोलणे पूर्णपणे ऐकून घेण्याआधीच पालकांच्या रागाचा पारा चढायला लागतो व त्यांची ती प्रतिक्रिया बघून मूल गप्प होते. How brain will become strong
मग अर्धवट ऐकलेल्या माहितीच्या आधारे पालक कृती करतात व त्यातून अनेक समस्या निर्माण होतात किंवा मुलाला एखादा त्रास असेल व त्यासंबंधी तो काही सांगत असेल तर ते पूर्णपणे न ऐकता लगेचच काही तरी निष्कर्ष काढून त्यानुसार कृती केली जाते अथवा त्याची तक्रार क्षुल्लक मानून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारच्या वागण्यातूनदेखील फार मोठय़ा समस्या निर्माण झाल्याची उदाहरणे आहेत. मेंदू हा जसा बाहेरचा कोलाहल ऐकतो तसाच तो आपल्या आत चाललेला कोलाहलदेखील ऐकू शकतो.
आपल्या मनात सातत्याने चालू असलेला विचारांचा कल्लोळ, आपल्या आत उद्भवणाऱया भय, क्रोध, द्वेष, हिंसा, मत्सर, चिंता, दु:ख इत्यादी विविध प्रकारच्या मानसशास्त्रीय प्रतिक्रिया यासुद्धा आपला मेंदू ऐकत असतो. परंतु या बाबतीतसुद्धा तो जे ऐकतो त्याचा अर्थ लावत बसतो व याचा परिणाम खूप सगळे मानसशास्त्रीय ज्ञान गोळा करण्यात होतो ज्यामुळे मेंदू अधिकाधिक संस्कारबद्ध होत जातो. यातून प्रश्न उद्भवतो, की असे एक वेगळय़ा प्रकारचे ऐकणे आहे का, की ज्यात कोणतेही ज्ञान गोळा करण्याची प्रक्रिया घडत नाही. मानसशास्त्रीय मुक्ती म्हणजे भय, क्रोध, हिंसा, द्वेष, इत्यादी मानसशास्त्रीय घटकांचा पूर्ण अंत. परंतु ज्ञान गोळा करण्याच्या प्रक्रियेमुळे या घटकांचा अंत होण्याऐवजी त्यात भरच पडत जाते. या घटकांचा अंत व्हायचा असेल तर सर्वप्रथम मानसशास्त्रीय ज्ञान गोळा करण्याची प्रक्रिया थांबली पाहिजे. पण हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण आपल्यात उद्भवणाऱया प्रत्येक मानसशास्त्रीय प्रतिक्रियेला पूर्णपणे व लक्षपूर्वक ऐकतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App