नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रिटायरमेंट वरून अनेक खुलासे + प्रतिखुलासे झाले. तो विषय देखील राजकीय वर्तुळाने आणि माध्यमांनी बासनात गुंडाळून टाकला. त्यानंतर मोदींचा चीन आणि जपान दौरा सुद्धा यशस्वी झाला. मोदींनी भारतात येऊन कामाला सुरुवात केली. हे सगळे घडून गेल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अचानक जागे झाले आणि त्यांनी मोदींच्या रिटायरमेंट विषयी एका जाहीर परिषदेत स्वप्नरंजन केले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हणे, मोदींना रिटायर व्हायला सांगितले आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागणार आहेत, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर परिषदेत केला. त्यामुळे देशाच्या सोडा पण महाराष्ट्राच्या किंवा बुलढाणा जिल्ह्यातला राजकारणातही कुठला “भूकंप” झाला नाही.
मोदींच्या रिटायरमेंटची चर्चा आठ – दहा दिवसांपूर्वी देशाच्या राजकारणात घडून गेली. मोदी 12 सप्टेंबरला 75 वर्षांचे होणार त्यामुळे त्यांनीच लागू केलेल्या नियमानुसार त्यांनी रिटायर व्हायला पाहिजे, अशी आशा आणि अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्याला शरद पवारांनी राजकीय फोडणी देऊन झाली. त्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दिल्लीत विज्ञान भवनात व्याख्यानमाला झाली. त्यानंतर प्रश्नोत्तरे झाली. त्या प्रश्नोत्तरांमध्ये भागवतांनी रिटायरमेंट विषयी स्पष्ट खुलासा केला. 75 वय झाले तरी मी आणि मोदींनी रिटायर व्हायची गरज आणि आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. तरी देखील सपकाळ यांनी मोदींच्या रिटायरमेंट विषयी स्वप्नरंजन केले.
– सपकाळांचे स्वप्नरंजन
महाराष्ट्रात मतचोरीच्या प्रयोगाची सुरवात कामठी विधानसभा क्षेत्रातून झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने परिषदेचे आयोजन केले. त्यात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ‘वोट चोर, गद्दी छोड’ या काँग्रेसच्या कॅम्पेनची आज कामठी येथून सुरवात झाली. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुर्ची खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशात लवकरच मध्यावधी निवडणूका लागणार आहेत. त्यासाठी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे सपकाळ यांनी सांगितले.
‘व्होट चोर गद्दी सोड
दुसरीकडे, सोमवारी (1 सप्टेंबर) राजधानी पाटणात मतदार हक्क यात्रा संपली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “बिहारमध्ये ‘वोट चोर गद्दी सोड’ ही एक नवीन घोषणा सुरू झाली आहे, ती लोकांना खूप आवडत आहे. चीन आणि अमेरिकेतील लोकही म्हणत आहेत, ‘वोट चोर, गद्दी सोड.”
– राहुल गांधींचे अभियान
राहुल गांधी यांनी ‘मतदार हक्क यात्रे’ला संबोधित करताना म्हटले की, “महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून निवडणुका चोरला गेल्या. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत सुमारे एक कोटी नवीन मतदार जोडले जातात. आमच्या आघाडीला विधानसभेत लोकसभा निवडणुकीत जितकी मते मिळाली तितकीच मते मिळाली, पण सर्व नवीन मते भाजपच्या खात्यात गेली. का? कारण निवडणूक आयोग आणि भाजपने मिळून मते चोरली. मी बिहारच्या तरुणांना सांगू इच्छितो की मतदान चोरी म्हणजे हक्क, आरक्षण, रोजगार, शिक्षण, लोकशाही आणि तरुणांच्या भविष्याची चोरी.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App