नेहमीपेक्षा रोज १५ मिंनिटे आधी उठा, योग्य दिनचर्या आखा


नॉर्मली सर्वांची सकाळची वेळ हि घाईची असते. मग तुम्ही नोकरदार व्यावसायिक अथवा गृहिणी किंवा अजून कोणत्याही प्रकारचे काम करत असा. कारण कामाला वेळेत सुरुवात झाली नाही तर पुढचा पूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांची एकाच घाई असते व सर्व जण उशीर झाला की मग वैतागतात, राग हा आपण राग हा जो समोर येईल त्यावर काढला जातो. व्यक्तीमत्व विकासासाठी जर आपण वेळेचे सुयोग्य आधीच नियोजन केले तर अशी धांदल उडणार नाही. चला आपण आपला दिवस चांगला करण्यासाठी काही योग्य दिनचर्या आखू या. त्यासाठी सर्वप्रथम लवकर उठणे गरजेचे आहे. Get up 15 minutes earlier than usual every day, follow the right routine

जे लोक पहाटे उठतात त्यांना फायदा होतो. यासाठी पहाटे साडेपाचला सर्वानी आपल्या दिवसास सुरुवात करावी. एक दिवस आपणास सर्व कामे आटोपून तयार होण्यास किती वेळ लागतो हे घड्याळ लावून पाहावे. साधारण पणे 45 मिनिटे व्यायाम, योगासने यासाठी दिल्यास मन व शरीर प्रसन्न होते व कामास उत्साह येतो. जर आपण देवपूजा करत असाल तर त्यासाठी वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. काही करत नसल्यास निदान गायत्री मंत्र योग्य रिदम मध्ये म्हणावेत. कारण ज्याप्रमाणे ओंकार ध्वनी म्हंटलं जातो आपल्या शरीरामध्ये कंपने व लहरी निर्माण होतात व त्या आपल्या डोक्यातील मेंदूपर्यंत पोचतात व मेंदूला जागृत करतात व चालना देतात. त्यामुळे आपल्या स्वतःसाठी काही जुन्या गोष्टी अंगिकारल्यास नुकसान न होता फायदाच होऊ शकतो.

जर सध्याची उठण्याची वेळ पुरत नसल्यास 15 ते 20 मिनिटे लवकर उठून ऐनवेळी होणारी गडबड टाळता येते. तसेच घर ते कामाचे ठिकाण यामध्ये ट्रॅफीक जॅम होऊ शकतो यासाठी 15 मिनिटे राखून ठेवावीत मग आपल्याला ट्रॅफीक लागले तरी कामावर पोहोचण्यास उशीर होणार नाही. अशा पदध्तीने सकाळच्या वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास दिवस योग्य पद्धतीने व्यतीत होण्यास फायदा होतो.

Get up 15 minutes earlier than usual every day, follow the right routine

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात