संवादावर लक्ष केंद्रीत करा, उडतउडत ऐकायचं सोडून द्या…

ऐकण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ज्याचे किंवा जिचे ऐकायचे आहे त्याच्या किंवा तिच्या विषयीच्या गोष्टीत रस म्हणजेच इंटरेस्ट घेतला पाहिजे. उडतउडत ऐकणे थांबविले पाहिजे. संवादात कुठलाही व्यत्यय येणार नाही याविषयी जागरूक राहिले पाहिजे. संवाद चालू असताना फोन करणे किंवा फोन घेणे टाळले पाहिजे. संपूर्ण लक्ष चालू असलेल्या संवादावरच पाहिजे. ज्याच्याशी संवाद चालू आहे त्याला अधूनमधून संवादविषयाच्या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजेत ज्याच्यायोगे त्याला खात्री पटेल की आपण त्याचे बोलणे खरोखर ऐकत आहोत व त्यायोगे तो संवाद पुढे चालू ठेवण्यास प्रवृत्त होईल. समोरचा माणूस बोलत असेल. Focus on the conversation, stop listening …

लिसनिंग स्किल रुजवणे म्हणजे नुसतं ऐकणे नाही तर जाणीवपूर्वक ऐकणे, ह्यासाठी खूप संयम असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण खालील युक्त्या वापरू शकतो. यासाठी समोरची व्यक्ती बोलत असेल तेव्हा व्यत्यय आणू नका. प्रत्येक बाबतीत आपलं स्वतःच मांडलच पाहिजे असं काही जरुरी नाही. अनेकदा समोरच्या व्यक्तीचे शांतपणाने ऐकले तरी अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. त्यातून अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतात. जेव्हा आपण कोणाचे तरी ऐकत असतो त्यावेळी आपला हावभाव फार महत्वाचे असतात. किंबहुना हे हावभाव अनेक गोष्टी न सांगता देखील सांगून जात असतात. त्यामुळे ऐकताना उगाच पेपर चाळणे , खिडकीबाहेर पाहणे अशा प्रकारचे वर्तन टाळा. चेहऱ्यावरील हावभाव आणि डोळ्यांची हालचाल ही सर्व महत्त्वपूर्ण असू शकतात. आपण जेव्हा ऐकत असतो तेव्हा समोरच्याला तुमच्या हावभावावरून कळू द्या. ऐकण्याची सवय जर नीटपणे अंगी बाणवायची असेल तर रोज ऑडिओबुक्स ऐकण्याचा सराव करा. त्यातून ऐकण्याची चांगली सवय लागते. शिवाय वेळही वाया जात नाही. त्याचबरोबर चांगले ज्ञान आत्मसात करण्याची संधीही मिळते ती वेगळीच. यातून सकस व दर्जेदार ऐकता येते.

Focus on the conversation, stop listening …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात