नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होईल. चार वादग्रस्त मंत्र्यांबरोबरच अन्य चार मंत्र्यांना हे नारळ देण्यात येईल, अशा गौप्यस्फोटाच्या बातम्या वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्यांनी मराठी माध्यमांनी पेरल्या. विश्व प्रवक्ते संजय राऊत यांच्या कडे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या कधी एकत्र येतील याची काही माहिती नाही, पण त्यांना मोदी सरकार पासून फडणवीस सरकार पर्यंत कोणाचे मंत्री कोण बदलणार आणि कसे बदलणार याची “बित्तंबातमी” आहे. अर्थात तसा आव आणत त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळातला फेरबदलाचा गौप्यस्फोट केला.
वास्तविक मंत्रिमंडळात फेरबदल होणार यात गौप्यस्फोट करण्यासाठी काही नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच आपले मंत्रिमंडळ परफॉर्मन्सच्या आधारावर काम करेल, असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी अनेक निकषही जाहीरपणे घालून दिले होते. त्यानुसार मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन करून फडणवीसांनी जर मंत्रिमंडळात फेरबदल केला, तर त्यात गौप्यस्फोट करणाऱ्यांचे credit शून्य असेल.
पण त्या पलीकडे जाऊन वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तरी त्यात विरोधकांचे credit फार नसेल. कारण मूळात 49 अशी मूठभर संख्या असलेल्या विरोधकांकडे ना संख्या आहे, ना राजकीय बुद्धी आहे. त्यामुळे विरोधकांनी फडणवीस सरकारला अडचणीत आणून कुणाचा राजीनामा घेतला, असे धनंजय मुंडे यांच्याबाबतीत देखील 100% म्हणता येणार नाही.
उंट तंबूत घेतल्याचे दुष्परिणाम
वास्तविक भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतःची राजकीय सोय साधून घेण्यासाठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांना महायुती घेऊन त्यांचे उंट आपल्या तंबूत घेतले. आणि त्या उंटांनी सगळा गोंधळ घालून ठेवलाय. धनंजय मुंडे यांना उर्मटपणा करायला, वाल्मीक कराडशी संबंध ठेवायला किंवा त्याला वाचवण्यासाठी स्वतःचेच राजकारण पणाला लावायला विरोधकांनी सांगितले नव्हते, तरी फडणवीस मंत्रिमंडळात राहून त्यांनी ते केले.
देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंत्रिमंडळाच्या आणि भाजपच्या प्रतिमेची फारशी चिंता न करता धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवले होते. त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला फार उशीर लावला. त्यामुळे त्याचे जे काही discredit असेल, ते फडणवीस आणि अजितदादांचे स्वतःचे होते. त्यात विरोधकांना credit देण्यासारखे काही नव्हते.
Sharad Pawar शरद पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक
असेच इथून पुढच्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत म्हणता येईल. माणिकराव कोकाटेंना वादग्रस्त वक्तव्य करायला कुण्या विरोधकांनी सांगितले नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हण, नंतर सरकारलाच भिकारी म्हण, असे कोणीही त्यांच्या कानात येऊन सांगितले नव्हते. विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळायलाही त्यांना विरोधकांनी सांगितले नव्हते. त्यांच्या फ्लॅटचे प्रकरण विरोधकांनी काढले नाही, तर माध्यमांनी काढले होते.
खडसे विरुद्ध महाजन
लोढा हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला राजकीय कलगीतुरा बाकीच्या विरोधकांनी लावलेला नाही. त्यांची झुंज जुनी आणि आपसांमधलीच आहे. त्याची धुणी तुम्ही सार्वजनिक पाणवठ्यावर धुवा, असे कुठल्याही विरोधकांनी त्यांना सांगितलेले नाही. आपली जुनी उणी दुणी सार्वजनिक पाणवठ्यावर धुवायची त्या दोघांनाच जास्त हौस आहे.
वचक आणि grip कमी पडतेय
संजय शिरसाट, योगेश कदम यांची प्रकरणे विरोधकांनी काढण्याच्या आधी माध्यमांमध्ये आली आणि त्यात विरोधकांनी राजकीय भांडवल शोधले. योगेश कदम आणि रामदास कदम यांना स्वतःलाच डान्सबार प्रकरण नीट हँडल करता आले नाही. त्यामुळे हे सगळे पाहून फडणवीसांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले आणि काही वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला तर त्यामध्ये त्या मंत्र्यांचे स्वतःचे कर्तृत्व त्यांना नडले, असे म्हणावे लागेल. त्यात विरोधकांना credit देता येणार नाही. कारण कुणाच्या विकेट काढायची विरोधकांची क्षमता नाही. ज्या काही विकेट पडतील त्या सगळ्या हिट विकेट आहेत यामध्ये भाजपच्या नेतृत्वाचा फडणवीस मंत्रिमंडळावरचा वचक कमी पडतोय आणि फडणवीस अजून मंत्रिमंडळावर grip पक्की बसवत नाहीयेत, असे म्हणता येईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App