लढाई कोरोनाशी; केंद्रावर खापर; पराभव आपल्याच मुलांचा; डोस उपदेशाचे काँग्रेसजनांना; परिणामी काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर… हा आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतला सारांश आहे. Elections for Congress President further postponed. Due to #COVID19 situation, it has been decided in CWC meet to postpone it
अख्ख्या देशाची लढाई कोरोनाशी निकाराची सुरू आहे. केंद्रापासून राज्यांच्या सरकारांपर्यंत सगळे कोरोनाशी लढाईत आपापल्या मगदूराप्रमाणे लढण्यात मग्न आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीची ऑनलाइन विस्तृत बैठक घेतली. यात खरे म्हणजे काँग्रेसकडून केंद्र सरकारला काही ठोस उपाययोजना सूचविण्याची अपेक्षा होती. पण झाले वेगळेच. कोरोनावरून सोनिया गांधींनी केंद्र सरकारला ठोकून काढले.
केंद्र सरकारच्या कथित आत्मप्रौढीवरून मोदींना जबाबदार धरले. भारताला मदत करणाऱ्या इतर देशांचे त्यांनी काँग्रेसच्या वतीने आभार मानले. हे शिष्टाचाराला धरून झाले. पण त्याचवेळी त्यांनी केंद्र सरकारला आत्मप्रौढ, अहंकारी असे संबोधून औचित्यभंगही केला. वास्तविक पाहाता हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे ठेऊन पक्षाचा आणि देशाचा आब त्यांना राखता आला असता. पण सोनियाजींनी तसे केले नाही. एकाच भाषणात त्यांनी एकाच वेळी परदेशी मदतकर्त्यांचे आभार मानले आणि मोदी सरकारला ठोकूनही घेतले.
पण यापेक्षाही सोनियाजींनी वरकडी केली, ती नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणूकांमधील पराभवाचे विश्लेषण करताना. त्यांनी काँग्रेसजनांना या पराभवावरून खडे बोल सुनावले. कटू सत्याला सामोरे जा. पराभवाचे विष पचवून पुढे जा, वगैरे उपदेशाचे डोस सोनियाजींनी काँग्रेसजनांना पाजले आणि इथेच कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित असलेले सगळे नेते चकित व्हायची पाळी आली.
कारण ज्या ५ राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला, त्या राज्यांमध्ये प्रचाराला काँग्रेसचे नेते प्रचाराला तरी गेले होते काय??, हा संशोधनाचा विषय आहे. सगळ्या प्रचाराची धुरा तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सोनियाजींच्या मुलांनीच संभाळली होती. मग काँग्रेसचा या ५ राज्यांमध्ये पराभव झाला, त्याची जबाबदारी त्यांचीच असली पाहिजे. ती इतर काँग्रेस नेत्यांची कशी काय ठरू शकते…??… पण नाही. त्यांना सोनिया गांधींचे खडे बोल ऐकून घ्यावे लागले. पराभवाची सोनियाजींनी लादलेली जबाबदारी इतर नेत्यांना स्वीकारावी लागली. कारण ही गांधी परिवाराची काँग्रेस आहे.
Elections for Congress President further postponed. Due to #COVID19 situation, it has been decided in CWC meet to postpone it as it won't be correct to hold elections in this scenario. In last CWC meet, Central Election Authority had proposed 23rd June as the poll date: Sources pic.twitter.com/Rj42TXykCr — ANI (@ANI) May 10, 2021
Elections for Congress President further postponed. Due to #COVID19 situation, it has been decided in CWC meet to postpone it as it won't be correct to hold elections in this scenario. In last CWC meet, Central Election Authority had proposed 23rd June as the poll date: Sources pic.twitter.com/Rj42TXykCr
— ANI (@ANI) May 10, 2021
विजयाचे हार – तुरे गांधी परिवाराने स्वीकारायचे आणि पराभवाचे जोडे इतर काँग्रेसजनांनी खायचे ही या काँग्रेसची पद्धत आहे. त्याला इलाज नाही. ज्यांना हे मान्य नाही, त्यांना १० जनपथ आणि २४ अकबर रोड यांच्या बाहेरचा रस्ता मोकळा आहे. या “मोकळ्या रस्त्याने” तर पुढे जाऊन ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये अभूतपूर्व विजय मिळविला आहे. पण तो विषय वेगळा आहे. त्याचा सोनियाजींच्या भाषणाशी संबंध नाही आणि इतर काँग्रेस नेत्यांवर लादलेल्या जबाबदारीचाही संबंध नाही. सोनियाजी एकदा म्हणाल्या ना… मग ते फायनल. त्याच्यापुढे अपील नाही.
आणि आता तर आजच्या बैठकीतला पुढचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय बाहेर आला आहे, तो म्हणजे कोरोना परिस्थिती चिघळल्यामुळे काँग्रेस अध्यक्षांची निवड पुढे ढकलली गेली आहे. आधीच्या शेड्यूलनुसार अध्यक्षांची निवड प्रक्रिया जून २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सोनियाजींनी आजच्या बैठकीत तसे जाहीर देखील केले होते. काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणूकीचे मुख्य अधिकारी मधुसुदन मिस्त्री यांनी कार्यक्रम निश्चित केला आहे. तो के. सी. वेणूगोपाल वाचून दाखवतील, असे सोनियाजींनी जाहीर केले होते. त्यानुसार वेणूगोपालांनी काँग्रेस अध्यक्ष निवडीचा एका ओळीचा कार्यक्रम बैठकीत वाचून दाखविला, तो अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्याचा होता.
एकूण काय बैठकीचा मुख्य अजेंडा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्याचा होता. पण तो एकदम जाहीर करता येत नव्हता. त्यामुळे अख्ख्या कार्यकारिणीची बैठक घ्यावी लागली. यात मग परदेशी मदतकर्त्यांचे आभार मानण्याची, केंद्र सरकारवर दुगाण्या झाडण्याची अन्हिके आधी उरकून घेण्यात आली. नंतर काँग्रेसच्या गांधी परंपरेनुसार एका ओळीचा प्रस्ताव पारित करण्यात आला… काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहे… बाकी काही नाही.
त्यामुळे लढाई कोरोनाशी; केंद्रावर खापर; पराभव आपल्याच मुलांचा; डोस उपदेशाचे काँग्रेसजनांना; परिणाम काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक लांबणीवर… हा आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतला सारांश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App