यशस्वी होण्याची कल्पना ही अतिशय व्यक्तीसापेक्ष असते. यशस्वी व्हायचे म्हणजे नक्की काय किंवा कशात हे आधी ज्याचे त्याने ठरवावे. आपण जीवनातील विविध क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतो मग ते तुमची नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध,एखादी परीक्षा अथवा एखादा स्वप्नवत जॉब मिळवणे यापैकी काहीही असू शकते. Dream big for success
कुणासाठी यशस्वी होणे म्हणजे अध्यात्मात उच्च शिखर गाठणे असु शकते तर कुणासाठी ते आरोग्यदायी जीवनशैली जगु शकणे असु शकते. महान शिल्पकार मायकेल अँजेलो म्हणाला होता, नेहमी मोठा विचार करा. ज्यांना मायकेल अँजेलो बद्दल जास्त माहिती नसेल त्यांनी थोडे गुगल करावे. त्याच्या 14 व्या शतकातील कलाकृती आजही जगाला प्रेरणा देतात.
कल्पना करा की मायकेल अँजेलो ने कलाकार बनण्याचे स्वप्न पाहिले नसते तर जग त्याच्या अनेक महान कलाकृतींना मुकले असते. अर्थात, बहुतांश लोक आपली स्वप्न बाजूला ठेऊन काहीतरी सोपे आणि व्यवहार्य असे काम करण्यात धन्यता मानतात. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, आपली महत्वाकांक्षा विसरून अल्पसंतुष्ट वृत्तीचा स्वीकार कराल तर यशस्वी होणे हे केवळ स्वप्नच बनून राहील. मोठा विचार करा, त्यावर कार्य करा.
अनेक संकटे येतील परंतु त्या विचाराशी प्रामाणिक रहा. यश हे तुमचेच असेल. जीवनात यशस्वी होण्याासाठी प्रत्येकाची वेगवेगळ्या पद्धतीने धडपड सुरु असते. मात्र अनेकदा छोट्या-मोठ्या गोष्टी त्रासदायक ठरतात. अशावेळी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. योग्य प्रमाणात तसेच संतुलित आहार घ्यायला हवा. दररोज व्यायाम करा. याने तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनता.
लवकर झोपा आणि लवकर उठा हि गोष्टी सतत फॉलो करा. व्यसनांपासून दूर रहा. कारण त्यामुळे आयुष्य कमी तसेच बरबाद होते. भौतिक सुखापेक्षा आपले अंतर्मन कसे आनंदी राहील याचा विचार करा. चांगल्या संगतीत राहा. तसेच नवनवीन गोष्टी शिकत राहा. कमी बोला आणि भरपूर ऐका ही गोष्ट आयुष्यात सर्वात प्रथम फोलो करा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App