भारतीय सैन्य दलांच्या इतिहासात सामरिक व्यूहरचनात्मक दृष्ट्या अतिमहत्त्वाच्या दुसऱ्या महनीय व्यक्तीचा मृत्यू हवाई दुर्घटनेत घडला आहे. याआधी भारतीय अणूशक्ती कार्यक्रमाची पायाभरणी करणारे महान शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा मृत्यू असाच हवाई दुर्घटनेत झाला होता आणि आज भारताच्या सैन्य दलाचे प्रमुख सी डी एस जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू हवाई दूर घटनेतच घडला आहे.Dr. Homi Bhabha – CDS Bipin Rawat; the two giants of strategic importants died in air crash
प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा हे भारताच्या अणुशक्ती प्रकल्पाचे जनक होते. भारताने अणुशक्ती संपन्न व्हावे. विज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे, हा त्यांचा ध्यास होता. भारतीय तंत्रज्ञानावर आधारित अणुभट्ट्या उभारण्याची त्यांची योजना होती. ही योजना तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या सरकारने मान्यही केली होती. नंतरच्या लालबहादूर शास्त्री सरकारने तिला अधिमान्यता दिली होती. परंतु डॉ. होमी भाभा हे युरोपमध्ये अणू शास्त्रज्ञांच्या एका बैठकीला जात असताना एअर इंडिया १०१ हे विमान माँट ब्लॅक या पर्वतरांगांमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले आणि त्यामध्ये डॉ. होमी भाभा यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाचा २४ जानेवारी १९६६ रोजी मृत्यू झाला. भारताच्या महत्त्वाकांक्षी अणू कार्यक्रमाला अत्यंत मोठा धक्का बसला. यावेळी डॉक्टर होमी भाभा यांचा मृत्यू दुर्घटनेत झाल्याचे सांगितले गेले असले, तरी त्यामागे अमेरिकन गुप्तहेर संघटना सीआएच घातपात असल्याच संशय होता. पण त्या पलिकडे जाऊन भारताच्या अणूशक्ती कार्यक्रमाचे मोठा धक्का बसला ही वस्तुस्थिती कोणालाही नजरेआड करता येणार नाही.
आज कुन्नूर जवळ तशीच दुर्घटना घडली. भारताच्या लष्करी सुधारणांचे अध्वर्यु आणि रचनात्मक सुधारणांचे प्रमुख कार्यवाहक सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. भारताच्या संरक्षण दलांना आत्मनिर्भर भारताच्या योजनेतून शस्त्रसंपन्न करण्याचा त्यांचा निर्धार होता. भारत फक्त मोठा शस्त्र आयातदार देश राहता कामा नये, तर शस्त्रास्त्र निर्मिती आणि निर्यातीत देखील त्याची भूमिका तितकीच मोठी असली पाहिजे, हा जनरल रावत यांचा ध्यास होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतातल्या 41 ऑर्डनन्स फॅक्टरींचे रूपांतर ७ कंपन्यांमध्ये करून शस्त्रास्त्रे आणि संरक्षण सामग्रीची निर्मिती करण्याची योजना आखली. तिचा सर्व आराखडा जनरल बिपिन रावत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. या ७ कंपन्यांना भारतीय संरक्षण दलांच्या उपयुक्त अश्या सामग्रीची पहिली ऑर्डर देण्यात आली आहे. तिची किंमत तब्बल 65 हजार कोटी रुपयांची आहे. या आणि अशा अनेक ऑर्डर्स आत्मनिर्भर भारत योजनेतून या कंपन्यांना देण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू आहे. जनरल रावत यांच्या निधनामुळे या योजनेला काहीसा धक्का बसला आहे.
जनरल रावत यांच्याच नेतृत्वाखाली भारताच्या चीनची लष्करी वाटाघाटी सुरू होत्या त्याच वेळी लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय भूमीवर आक्रमण केले. त्यांना भारतीय सैनिकांनी ज्या अत्यंत वरचढ पद्धतीने प्रत्युत्तर दिले आणि चीनला 42 सैनिक गमवावे लागले त्या आक्रमकते मागे जनरल बिपिन रावत यांची आक्रमक धोरणे कारणीभूत आहेत.
भारतीय लष्कराला जनरल बिपिन रावत यांनी बचावात्मक भूमिका सोडून आक्रमक भूमिकेत नेण्यात मध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने पाकिस्तानच्या भूमीत घुसून केलेले सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक हे त्यांच्याच मार्गदर्शनाचे परिपाक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाचे आणि सुधारणेचे अध्वर्यू अशा यथा योग्य शब्दात संबोधले आहे. यातच जनरल बिपिन रावत यांचे भारतीय सैन्य धरण संदर्भात असलेले योगदान लक्षात येते आणि त्यामुळेच त्यांच्या निधनाने भारताने नेमके काय गमावले आहे हेही ध्यानात येते.
भारताच्या अणूशक्ती धोरणाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे निधन हवाई दुर्घटनेत होणे आणि त्यानंतर 57 वर्षांनी देशात लष्कराचे सर्वोच्च अधिकारी जनरल बिपिन रावत यांचे निधन होणे अशाच हवाई दुर्घटनेत होणे दुर्दैवी योग आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App