माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे आवश्यक असते. नाही तर ते वाया जाते. Don’t miss the opportunity
माणसाच्या आयुष्याला कधी आणि कसं वळण मिळेल सांगता येत नाही. हा काळ खूप थोडा असतो फक्त तो योग्य वेळी ओळखावा लागतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की, त्या क्षणामुळे त्याचे भवितव्य ठरते.
क्षण अनुकूल असो वा प्रतिकूल ती संधी किंवा प्रसंग काही क्षणापुरताच असतो. उदाहरणच द्यायचे तर, समजा एखाद्याला
राग आला त्या रागाच्या भरात त्याने कुणाचा तरी खून केला. राग आला क्षणापुरता. पण त्याच्या आयुष्यातली किती वर्षे वाया गेली. कदाचित जन्मठेपेची चौदा किंवा आजन्म कारावास. आयुष्यच पणाला लागले. मुलाखतीसाठी फक्त पाचच मिनिटे पुरतात. त्यावर उमेदवाराची नोकरी ठरते.
त्या थोडय़ाच काळात तो मुलाखतकर्त्यांवर जी छाप पाडतो त्यावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. कुठल्या प्रकारच्या मुलाखतीला एखादी व्यक्ती जाते, किंवा कुठल्या परीक्षेला बसते त्यावर त्याच्या जीवनाचे स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग अवलंबून असते. तो उच्च अधिकारी होणार की सामान्य कारकून राहणार हे ठरते. आयुष्यात संधी पुष्कळ आल्या तरी बसल्या जागी त्या तुमच्या गळ्यात येऊन पडत नाहीत. संधी घ्यावी लागते.
इंग्लंडमध्ये थॉमस नावाचा लेथवर काम करणारा एक कारागीर होता. एकदा त्याला मद्यपानच्या निषेध संमेलनासाठी लिसेस्टर या गावी पंधरा मैल चालत जावे लागले. चालत जाताना त्याच्या मनात विचार आला की अशा संमेलनासाठी जर काही व्यवस्था आपण केली तर लोक जाऊ शकतील. आणि त्याने प्रवाशांच्या सुखसोयीसाठी, त्यांच्या तिकिटांची व्यवस्था करणारी एक कंपनी सुरू केली. ही प्रवासी कंपनी आज थॉमस कुक या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांची मोठमोठी जहाजेही आहेत. त्यामुळे साध्या गोष्टूतदेखील संधी दडलेली असते. गरज असते त्याकडे पाहून ती घेण्याची.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App