लाईफ स्किल्स : तत्काळ व्यक्त होवूच नका

ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ हा नेटवर्किंगचा काळ असल्याचे सतत बोलले जाते. म्हणजे एकवेळ तुमच्याकडे पद नसेल, पैसा नसेल पण मित्र मात्र असले पाहिजेत, तुमच्या भरपूर ओळखी असल्या पाहिजेत असे म्हटले जाते. कारण हे मित्रच तुमची खरी ताकद असते. या साऱ्यामध्ये संवादाला कमालीचे महत्व आहे हे लक्षात ठेवा. सुसंवाद असण्या-नसण्यावरच हे संबंध चांगल्या प्रकारे निर्माण होतात व टिकून राहतात. संवाद साधता येणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. संवादाची सुरुवात करण्यासाठी ऐकण्याची कला आत्मसात करणे ही पहिली पायरी आहे. त्यातूनच समस्यांचे समाधान होते. Don’t express yourself immediately

एकदा समोरच्या काय म्हणतोय ते शांतपणे ऐकायचे हे मनाशी ठरवले की पुढील अनेक गोष्टी फार सोप्या होत जातात. अनेकदा केवळ समोरच्याचे न ऐकल्याने गैरसमज होतात. कारण त्याला काय म्हणायचे आहे हे न ऐकताच जर आपण त्याविषयी मनात काही ग्रह पक्के केले तर त्यातून जादाचे गैरसमज होतात. त्यामुळे नेहमी समोरच्या व्यक्तीला त्याचे पूर्ण मत मांडू द्यावे. तसेच समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर तत्काळ प्रतिक्रिया व्यक्त करू नये. कारण असे केल्याने चुकीचा संदेश जाण्याचा धोका असतो. समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकल्यावर त्यावर शांतपणे विचार करावा. तत्काळ प्रतिक्रिया देण्याची गरज नसेल तर नंतर बोलतो असे सांगावे. यामुळे संवादाची प्रक्रिया उत्तमप्रकारे पूर्ण होते. जेथे स्वत:शी संवाद नाही तेथे आत्मपरीक्षण नाही व पर्यायाने प्रगती नाही.

संवाद हे आपल्या जिवंतपणाचे, माणूसपणाचे लक्षण आहे. आपल्या मनातील भावना, विचार प्रकट करता येणे, योग्य पद्धतीने मांडता येणे गरजेचे आहे. त्यातूनच सुख बहरते व दु:ख हलके होते. शिळोप्याच्या गप्पा मनावरील ताण हलका करण्यास मदत करतात. त्यामुळे आपल्या दिवसभराच्या दिनक्रमात निरोगी संवादाला योग्य महत्व द्यावे.

Don’t express yourself immediately

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात