विज्ञानाचे डेस्टीनेशन : मणिपूरच्या एका शेतक-याने केली कमाल, तांदळाच्या चक्क 165 प्रजातींचा लावला शोध


मणिपूरच्या एका शेतक-याने कमाल केली आहे. मणिपूरमध्ये जैव वैविध्याचे संवर्धन करण्यात पारंगत असलेल्या पोतशंगबम देवकांत यांनी तांदूळच्या शंभर परंपरागत प्रजातींना सेंद्रीय पध्दतीने पुनरुज्जीवित केले आहे आणि नवा आदर्श निर्माण केला आहे. मणीपूरच्या पोतशंगबम देवकांत यांनी आपल्या छंद आणि झोकून देण्याच्या वृत्तीतून एक दोन नाही तर १६५ तांदूळाच्या प्रजातींचा शोध लावला आहे. आपल्या हिरव्यागार शेतात देवकांत यांनी २५ प्रजाती शोधून काढल्या, आणि त्या शिवाय त्यांनी आणखी देशी शंभर प्रजातींचे संरक्षण देखील केले आहे. पाच वर्षांपूर्वी पी देवकांत यांनी आपल्या घरी इम्फाळ मध्ये तांदूळाच्या प्रजाती तयार करण्यास सुरूवात केली. Destination of Science: A Manipur farmer discovers 165 varieties of rice

६५ वर्षांच्या देवकांत यांनी हे काम छंद म्हणून सुरू केले होते. मात्र त्यांना आता त्याचे वेड लागले आहे. पाहता पाहता त्यानी पूर्ण मणिपूरच्या डोंगरी भागात पारंपारिक धान (भात) पिकाच्या प्रजातींच्या संशोधनाची मालिका तयार केली. ते केवळ तांदूळाच्या प्रजातींची शेती करत नाहीत तर ज्या औषधी गुणांच्या प्रजाती आहेत त्यांची देखील लागवड करतात. त्यात सर्वात महत्वाची आहे, चखाओ पोरेटन नावाचे काळे तांदूळ. या काळ्या तांदूळात असलेल्या औषधी गुणांमध्ये वायरल फिवर, डेंग्यू, चिकनगुनिया, आणि कर्करोग सुध्दा बरा करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांच्या छंदामुळे देवकांत यांनी पाहता पाहता मणिपूरच्या दुर्गम भागातील डोंगरी भाग पिंजून काढला, त्यांना तांदूळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींचे बीज मिळाले, असे असले तरी अनेक प्रकारच्या प्रजातींचे बीज त्यांना अद्यापही मिळू शकले नाही. त्यांनी कमी पाण्यात तयार होणा-या पांढ-या तांदूळासोबत काळ्या रंगाच्या तांदूळाची निर्मिती केली आणि त्याचा प्रचार देखील ते करतात. मणिपूरच्या काळ्या तांदूळाच्या अनेक प्रजाती वाढविल्या जातात, त्यात चखाओ पोरेटन सर्वोत्तम आहे. दुष्काळ सदृश्य भागात देखील हे पीक घेता येवू शकते. देवकांत यांचा दावा आहे की शरीरातील कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावर हा तांदूळ गुणकारी आहे.

Destination of Science : A Manipur farmer discovers 165 varieties of rice

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात