तुम्हाला यशाकडं घेऊन जाणाऱ्या अशा कितीतरी क्षमता असतात. ज्या आय क्यूच टेस्टमध्ये मोजल्या जाऊ शकत नाहीत. विख्यात शास्त्रज्ञ व संशोधक गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धान्त मांडला आणि मानवी बुद्धिमत्तेला ठोकळेबाज आयक्यूव टेक्सीमधून बाहेर काढलं. स्वविषयक बुद्धिमत्ता व परस्परसंबंधांतील बुद्धिमत्ता या क्षमता गार्डनर यांनी व्यक्तिगत क्षमतांमध्ये अंतर्भूत केल्या होत्या, ज्या संशोधक थार्नडाइक यांच्या सामाजिक क्षमतां’शी मिळत्याजुळत्या होत्या. या व्यक्तिगत आणि सामाजिक क्षमतांची तळी पुन्हा एकदा उचलून धरली ती पीटर आणि रॉबर्ट स्टेनबर्ग यांनी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गणिती किंवा तार्किक प्रज्ञेपेक्षा या क्षमतांची अधिक गरज असते, हे त्यांनी निःसंदिग्धपणे मांडलं. Cultivate emotional intelligence for success
एवढंच नव्हे, तर या क्षमता भावनिक स्वरूपाच्या असतात, हे स्पष्ट करून भावनिक बुद्धिमत्तेची कल्पनाही ठोसपणे मांडली आणि अखेर बराच काळ बहिष्कृत ठेवल्या गेलेल्या भावनेला बुद्धिमत्तेच्या प्रांगणात अधिकृत प्रवेश दिला गेला. सॅलोव्हो यांनी उलगडलेले भावनिक बुद्धिमत्तेचे घटक वा पैलू असे आहेत. स्वतःच्या भावना ओळखणे. अनेकदा आपल्याला स्वतःच्या भावनांची यथायोग्य जाणीव नसते. आपल्याला दुःख झालंय की राग आलाय. आपल्या अंतरीच्या खऱ्या भावना ओळखता येणं, त्या आधारे विचार करून योग्य निर्णय घेता येणं हे भावनिक शहाणपणाचं लक्षण ठरतं. आपल्याला नेमकं काय हवं आहे, हे कळल्याशिवाय त्या दृष्टीनं प्रयत्न होत नाहीत. ज्यांना ते कळतं ते मात्र सहजतेनं व आत्मविश्वा सानं यशाकडं वाटचाल करू शकतात. भावनांचं नियमन करणे.
आपल्या अंतरंगात भाव भावनांचा खेळ सतत सुरू असतो. भावना कमी-अधिक तीव्रतेच्या असतात. परिस्थितीही सतत बदलत असते. या सर्व चढ उतारात आपल्या भावना पुरेशा नियंत्रणात ठेवणं, त्या योग्य रीतीनं हाताळणं गरजेचं असतं. ज्यांना हे साधत नाही, ते चटकन निराश, चिंताग्रस्त होतात. मात्र ज्यांच्याकडं हे कौशल्य असतं, ते स्वस्थपणे, शांतपणे विचार करू शकतात. योग्य कृती करू शकतात व प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App