
लहान मुलांचे डॅक्टर म्हणतात लहान मुलांना तुम्ही अनेक रंगाच्या, आकाराच्या वस्तू दाखवा. अनेक नवनवीन ठिकाणं दाखवा. लहान मुलं वेगवेगळे रंग पाहतील त्याला कधी रडून कधी भितीनं कधी आनंदानं प्रतिक्रीया देतील. आकारातलं नाविन्य बघताना हात लावून , कधी ती वस्तू हातात घेऊन पाहतील. विविध ठिकाणांना हे याच्यासारखं, त्याच्यासारखं ठिकाण वाटतं म्हणून तुलना करू पहातील. तिथंच तर त्यांचा मेंदू नवनव्या विचारानं उद्दीपीत होतो आणि बुद्धीचा विकास व्हायला मदत मिळते. Cultivate children’s curiosity and curiosity
लहान मुलांना काय किंवा मोठ्या माणसांना काय प्रश्न पडला की कुतूहल निर्माण होते. या कुतूहलापोटीच आजवर अनेक शोध लागले आहेत. तेव्हा आपल्यातील कुतूहल संपू देऊ नका. चांगले नेमके प्रश्न पडायला हवेत याचीच स्वत कडून अपेक्षा करा. उत्तर शोधण्याच्या प्रकीयेत विकास होईल. चौकसपणातूनच मग पहिल्यापासून शेवटपर्यंत तर्कसंगत विचार व्हायला लागतो. प्रत्येक गोष्टींची एकामेकाबरोबरची साखळी आपण शोधायला लागतो. त्यातूनच कधी उत्तर मिळते किंवा कधी आपण उत्तराच्या आसपास पोहचतो. याचा परिणाम म्हणजे बुद्धीचा विकास. स्वतःला प्रश्न विचारायचा आणि त्याचे उत्तर शोधण्याचा प्रवास करायचा. प्रत्येक वेळी योग्य अयोग्य ठरवत निर्णय घेणे यामुळे बुद्धीचा कस लागतो. बुद्धीवर सकारात्मक ताण येतो. यालाच शास्त्रीय भाषेत ब्रेन जीम म्हणतात. यामुळे प्रत्येकाने स्वतःची तसेच घरातील लहान मुलांची चौकस वृत्ती जोपासण्यासाठी मदत करायला हवी. मुलांच्या चौकस प्रशांना शक्य तीतकी सविस्तर व योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. उगाच वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करू नये. समजा उत्तर माहिती नसेल तर काहीही थातूरमातूर कारण देवून पळ काढू नये. ते उत्तर माहिती करून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे आपल्या माहीतीतदेखील मोलाची भर पडण्यास मदत होते.