कोरोनाचे असेही विचित्र परिणाम

कोरोना काळात लोकांशी असलेला संपर्क, गेट टुगेदर यांचे प्रमाण कमी झाल्याने लोक एकाकी पडले असून, त्यांच्यातील नैराश्या त दुप्पट वाढ झाल्याचे ब्रिटनमधील ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स च्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्याचबरोबर भविष्याच्या चिंतेतून लोकांच्या स्मरणशक्तीवर मोठा परिणाम होत आहे. लॉकडाउननंतर तुम्ही एखादा इ-मेल पुढे पाठवण्यास विसरत असल्यास, एखादा शब्दच आठवत नसल्यास किंवा दुकानात गेल्यावर नक्की काय आणायचे याचा गोंधळ उडाल्यास हा त्रास होणारे तुम्ही एकटे नाहीत, हे लक्षात घ्या. हा परिणाम तुम्हाला समाजापासून दूर, एकटे राहावे लागल्याचा आहे. एकटेपणामुळे पूर्वी खूप चांगली स्मरणशक्ती असलेले लोक आता छोट्या-छोट्या गोष्टी विसरू लागले आहेत. Corona also had such bizarre consequences

लोकांत मिसळण्यावर आलेल्या मर्यादांमुळे मेंदूवर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असून, याचा सर्वाधिक फटका आधीच स्मरणशक्तीच्या समस्या असलेल्यांना अधिक बसत आहे. एकच गोष्ट अनेकांना अनेकदा सांगितल्याने आपल्या आठवणी एकत्र होत राहतात, याला एपिसोडिक मेमरिज म्हणतात. व्यक्ती समाजात न मिसळल्यास या आठवणी धूसर होत जातात. बाहेर फिरणे बंद झाल्याने, विवाहांसारखे प्रसंग रद्द झाल्याने, सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडल्याने लोकांकडे बोलण्यासाठी खूप कमी गोष्टी शिल्लक आहेत. लोक ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून ही कमतरता भरून काढत आहेत, मात्र त्यांना थेट संवादाची सर येत नाही. या संवादात तुम्ही वरवरच्या गोष्टी रंगवून सांगण्यातच धन्यता मानता.

तुम्ही फिरायला गेल्यास प्रवास, बदलणारा निसर्ग, भेटलेले लोक यांमुळे तो दिवस वेगळा लक्षात राहतो व आठवणी तयार होतात. मात्र, तुम्ही घरातून काम करता, तेव्हा प्रत्येक ऑनलाइन मिटिंग एकसारखीच वाटते, कारण तुम्ही एकाच जागी व एकाच स्क्रीनसमोर बसता. त्यामुळे वेगळ्या करता येण्याजोग्या आठवणी तयार होत नाहीत. तुम्ही घराबाहेर पडल्यावर पुन्हा घरी येईपर्यंत मेंदूमधील हिपोकॅम्पस या भागाचा वापर करीत असता. घरातून काम करणाऱ्यांनी अनोळखी रस्त्यांवरून फिरायला जाण्यासारख्या गोष्टी केल्यास हा भाग वापरात येईल. त्याचप्रमाणे सतत जागा बदलणे, घरात वेगवेगळ्या जागांवरून फोनकॉल्स घेणे, विकएण्डला पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने साजरे करणे या गोष्टी केल्यासही फरक पडेल.

Corona also had such bizarre consequences

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात