ज्येष्ठ पत्रकार आणि द फोकस इंडियाचे स्तंभलेखक दिनेश गुणे यांच्या एका फेसबुक पोस्टवर त्यांचे सन्मित्र रवी वाघमारे यांनी उत्तरादाखल एक पोस्ट लिहिली. . ही सामान्य शेतकऱ्याची भावना आहे! असे स्पष्ट करून ती दिनेश गुणे यांनी आपल्या वॉलवरून आवर्जून प्रकाशित केली आहे.
रवी वाघमारे
खरं तर केंद्र शासनाने वेळोवेळी हे स्पष्ट केले आहे की मंडी किंवा एपीएमसी बंद करणार नाही .. पण विडंबना अशी आहे की शेतकरी आंदोलन करतायेत की मंडी बंद करू नका व मंडी बंद झाली तर ज्याचे जास्त नुकसान होणार ते बाजारात ले आडत व व्यापारी दलाल निवांत आहेत… म्हणजे जे लुटतात त्यांच्यासाठी शेतकरी भांडण करतोय…comman farmer unhappy over farmer politics
मी एक शेतकरी आहे… सध्या माझे एक फळबाग माल चालू झालाय पण रेट नसल्याने मला तो तोडणी खर्च पण अंगावर येतोय…. मी मार्केटला माल डायरेक्ट पाठवला तर मला 13 रु किलो ने पट्टी मिळते व खर्च रुपये 9 वजा जाता हातात 4 रु किलो मागे सुटतात यात मी वर्षभर झालेली मेहनत औषध मशागत याचा विचार च केला नाही… 9 रु हे वाहतुक तोडणी पॅकिंग यावर त्या दिवसाचा खर्च आहे….
परंतु माझा माल मी बांधावर एखाद्याला दिला तर तोच माल त्याच ट्रान्सपोर्ट ने त्याच बाजारपेठ व त्याच आडतील दिला की त्याला 34 रुपये ने पट्टी येते…. मग हे निश्चित होत नाही का की जी सध्या व्यवस्था आहे ती खाजगी दलाल व्यापारी वाहरूंकदार याना जगवण्यासाठी आहे….यामुळे माझा 15 ते वीस टन माल डोळ्यादेखत पिकून खाली पडून सडून चाललंय… आणि इतर पिकांच्या बाबतीत पण थोडीफार हीच परिस्थिती वाहे. किसान बिल येवो किंवा ना येवो पण एवढे निश्चित की सध्या जी परिस्थिती आहे…ती नक्कीच चांगली नाही….
दुसरे उदाहरण… सरकार मक्याला 1850 रु भाव जाहीर करतेय… पण बाहेर व्यापारी ते 1100 पासून 1300 पर्यंत च विकत घेतात… त्यावर कोणाचं नियंत्रण आहे का? मग फक्त किसान बिल मध्ये उलकेख आहे म्हणून फक्त विरोध करायचा का ? सरकार धान्य खरेदी केंद्र सुरू करते पण तिथे ही ह्या खासगी दलालांचाच सुळसुळाट आहे… त्यांनी सर्व नंबर आधीच अडवून ठेवले असतात….. अशी असंख्य उदाहरण आहेत….
मला नाही वाटत की मी शेतकरी असताना दलालांना फायदा मिळावा अश्या संपात सहभागी व्हावं…. मी या शेतकरी आंदोलन ला सपोर्ट करेन पण फक्त शेतीच्या मुद्द्यावर….. विरोधी पक्षात राहून राजकारण करायचं म्हणून नाही….. काँग्रेस च्या मागील निवडणुकीत जाहीरनाम्यात हे ही लिहिलं होतं की सरकार एपीएमसी एकट बंद करणार मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारने हे जाहीर केलं होतं व त्यात हे सर्व पक्ष होते जे भारत बंद करणार आहेत…
म्हणजे काँग्रेसने विचार केला की चांगला व भाजपने केला की वाईट असा अर्थ होतो का? ह्या वाक्य वरून कोणी मला भाजप समर्थक असा शिक्का मारू शकेल…. मग दस्तुरखुद्द श्री. शरद पवारांनी 2010 साली केंद्र सरकारला लेखी सूचना करून… खाजगी व्यापाऱ्यांना मदत होईल अशी धोरण ठरवण्याची मागणी केली होती ती… भाजपच्या सांगण्यावरून केली होती का?
मला या राजकारणापेक्षा जास्त रस आहे तो हे आंदोलन संपून खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यात… विरोधी पक्षांचं बाहुली बनून काही माझे शेतकरी बांधव ह्यात वाहवत चालले आहेत हे पाहून मनाला खंत वाटते…
(सौजन्य – फेसबुक)
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App