सकाळी नाश्ता् करण्याला आपल्याकडे महत्त्व आहे. घरातून बाहेर पडताना पोटभर खाऊन जा, असे बुजूर्ग लोक आवर्जून सांगतात. सकाळी पोटभर नाश्ताे दिवसभरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी उत्तम आहेच. इंग्रजीमध्ये नाश्त्याला ब्रेकफास्ट म्हणतात. याचा अर्थ रात्री तुम्ही जेवल्यानंतर झोपता. दुसऱ्या दवशी सकाळी उठेपर्यंत आपण काही खाल्लेले नसते. त्यामुळे खाण्याच्या बाबतीत सलग आठ दहा तासांचा गॅप पडलेला असतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी काही खाता त्यावेळी तो फास्टमधील ब्रेक असतो.Breakfast is a very important meal – it can either make or break your day
त्यामुळे सकाळी नाश्ता केला की शरीरासाठी त्यातही मेंदूसाठी सकाळी पटकन उर्जा मिळते. मात्र त्याहीपेक्षा टाइप-२ चा मधुमेह असणाऱ्यांसाठी तो अतिशय लाभदायक असल्याचे तेल अविव विद्यापीठातील तज्ज्ञांच्या नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. संशोधन गटाने केलेल्या अभ्यासात नवी रंजक माहिती समोर आली आहे. आपल्या देशातील मधुमेहींची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हे संशोधन मोलाचे व महत्वाचे आहे. या नव्या संशोधनानुसार टाइप-२ पद्धतीचा मधुमेह असणाऱ्यांनी दिवसभरात तीन टप्प्यांत भोजन करणे आवश्याक आहे.
यामध्ये सकाळचा पोटभर नाश्ताह, साधारण जेवण आणि रात्रीचा मितआहार असावा. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतात. यामुळे इन्शुलिनचे कमी प्रमाणात लागते, त्याचबरोबर वजनही नियंत्रणात राहते. या अभ्यासासाठी टाइप-२ चा मधुमेह असलेल्या ५० ते ७० वयोगटातील ११ महिला व १८ पुरुषांची निवड करण्यात आली. त्यांना योग्य प्रमाणात आहार ठरवून देण्यात आला.
तीन महिन्यांनंतर या रुग्णांना कमी प्रमाणात इन्शुलिन लागल्याचे स्पष्ट झाले. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी आहार आवश्यलक आहे असे या अभ्यासगटातील संधोधकांचे ठाम मत आहे. सध्या जगात सर्वाधिक मधुमेही लोक भारतात असल्याने आपल्याला मुधुमेहाची राजधानी असल्याचे मानले जाते. जीवनशैलीत बदल केल्यानेच मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते असे मानले जाते. त्यामुळे या संशोधनाचा फायदा होईल यात शंकाच नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App