अनुमस्तिष्क हा मेंदूचा फार महत्वाचा भाग मानला जातो. त्याला लहान मेंदू असेही म्हणतात. अनुमस्तिष्क हा पश्चकरोटी पालीच्या खाली व मागे असतो. अनुमस्तिष्काचे अग्रपाली, पश्चपाली आणि प्रघाण अनुमस्तिष्क पाली असे तीन भाग असतात. अनुमस्तिष्काचे बाह्यांग पातळ असते. खालच्या बाजूने पाहिल्यास अग्रपाली आणि पश्चपाली यांच्या दरम्यान प्रघाण अनुमस्तिष्क पाली दिसून येते. अनुमस्तिष्क हा मस्तिष्क स्तंभ, अनुमस्तिष्क सेतू आणि मस्तिष्क पुच्छ या भागांना प्रमस्तिष्क वृंताद्वारे जोडलेला असतो. अनुमस्तिष्काचा आतील भाग म्हणजेच इनर मेडुला पांढऱ्या पदार्थापासून, तर बाहेरील भाग करड्या पदार्थापासून बनलेला असतो. Brain Discovery and Enlightenment: The brain that controls and regulates the movements of the whole body
अनुमस्तिष्काच्या बाह्यभागावर अनेक वळ्या असतात. त्याच्या अग्रपाली आणि पश्चपाली गुंतागुंतीच्या प्रेरक हालचालींवर नियंत्रण ठेवतात, तर प्रघाण अनुमस्तिष्क पाली शरीराचा तोल सांभाळते. त्याच्याच बरोबरीने मेंदूचा आणखी एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मध्यमस्तिष्क. प्रमस्तिष्काच्या मधल्या व खालच्या भागात, मस्तिष्क स्तंभाच्या वर आणि त्याच्याशी जोडलेला हा मेंदूचा भाग असतो. मध्यमस्तिष्क हा भाग दृष्टी, श्रवण, प्रेरक नियंत्रण, झोप, जागेपण, सावधपणा आणि तापमान नियमन या कार्यांशी निगडित असतो. मस्तिष्क स्तंभ हा प्रमस्तिष्काच्या खाली मध्यमस्तिष्काला जोडून असतो. याचे अनुमस्तिष्क सेतू आणि मस्तिष्क पुच्छ असे भाग असतात. मस्तिष्क स्तंभ एखाद्या देठाप्रमाणे असून तो कवटीमध्ये मागच्या भागात कवटीच्या हाडांवर टेकलेला असतो. कवटीला जेथे बृहत् रंध्र असते तेथून मस्तिष्क स्तंभाशी सलग असलेला मेरुरज्जू मानेत शिरतो. मेरुरज्जू हा मस्तिष्क स्तंभाचा विस्तारित भाग मानला जातो.
मस्तिष्क स्तंभापासून कर्पर चेतांच्या बारा जोड्यांपैकी दहा चेता निघालेल्या असतात. तसेच मस्तिष्क स्तंभामध्ये अनेक कर्पर चेता व परिघीय चेता यांची केंद्रके, तसेच श्वसन क्रिया, डोळ्यांची हालचाल, शरीराचा तोल इ. क्रियांवर नियमन राखणारी केंद्रके असतात. त्याचप्रमाणे सु. १०० केंद्रकांपासून बनलेली जालीय रचना असून तिच्याद्वारे शरीराच्या हालचालींचे नियंत्रण, हृदयाचे नियंत्रण, वेदनांचे नियमन, झोप, सवयी लावून घेणे अशा क्रिया होतात. मस्तिष्क स्तंभामधून प्रमस्तिष्क बाह्यांग आणि शरीराच्या सर्व भागांकडे माहितीचे वहन करणारे अनेक चेता मार्ग गेलेले असतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App