नाशिक : मुंबई, ठाण्यात जमवली तरी 14 महापालिकांमध्ये युती तुटली. कारण भाजप आणि शिवसेना यांना स्वबळाची खुमखुमी आली. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुंबई आणि ठाण्यात युती जमवली. मुंबईत भाजपने 137 तर शिवसेनेने 90 जागा लढवणे कबूल केले, तर ठाण्यात शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवर लढण्याचे कबूल झाले. BJP Shivsena
पण बाकीच्या 14 महापालिकांमध्ये दोन्ही पक्षांचे नेते युती जमवू शकले नाहीत. कारण दोन्ही पक्षांच्या नेत्यांना स्वबळ आजमावण्याची खुमखुमी आली. यात भाजपच्या नेत्यांना स्वबळाची जास्त खुमखुमी आली. त्यांचे गिरीश महाजन, अतुल सावे यांच्यासारखे मंत्री शिवसेनेशी युती करण्यापेक्षा स्वबळावर लढण्यावर भर देत राहिले. त्यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा पाठबळ दिले. या सगळ्या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकृतदर्शनी तरी नामानिराळे राहिले. पण त्यांनी कुठेही भाजपचे स्वबळ अडवायचा प्रयत्न केला नाही.
भाजपने आधी अजित पवारांचा राष्ट्रवादीला महायुतीतून दूर सारले. त्यांना सगळीकडे एकटे लढायला लावले. त्यानंतर शिवसेनेशी वाटाघाटी करत असल्याचे दाखवून शिवसेनेला प्रत्यक्षात फारच कमी जागांची ऑफर दिली.
– 14 ठिकाणी युती तुटली
त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे उल्हासनगर, छत्रपती संभाजी नगर, सांगली आणि जालना या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप यांची युती तुटली. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढायला मोकळे झाले. कारण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आज सगळीकडेच फॉर्म भरले.
– उदय सामंतांचा खुलासा
29 पैकी 14 महापालिकांमध्ये युती तुटल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत हे खुलासा द्यायला पुढे आले. माघारी साठी अजून दोन दिवस आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र बसून मार्ग काढतील आणि जास्तीत जास्त महापालिकांमध्ये युती घडवून आणतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. भाजप मधल्या कुठल्याही निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात कुठला शब्द दिलेला नाही.
– निवडणुकीनंतर एकत्र
त्यामुळे 14 महापालिकांमध्ये तुटलेली युती जशीच्या तशी कायम राहण्याची शक्यता असून शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष निवडणुकीत स्वबळ आजमावतील आणि निकालानंतर नेहमीप्रमाणे एकत्र येतील हीच शक्यता दाट असल्याचे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App