बारामतीत लागली लढाई “मोदी विरुद्ध राहुल”; पण त्यामुळे का झाली पवारांची हवा गुल??


बारामतीत फडणवीसांनी लावली लढाई “मोदी विरुद्ध राहुल”; पण त्यामुळे का झाली पवारांची हवा गुल??, असा सवाल विचारायची वेळ आता आली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या इंदापूर दौऱ्यानंतर बारामतीतले सगळे वातावरण “मोदी विरुद्ध राहुल” असे झाल्याने शरद पवार पूर्ण अस्वस्थ झालेत आणि त्यांनी अक्षरशः पायाला भिंगरी लावून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये जिरायती भागातले दुष्काळी तालुके पिंजून काढायला सुरुवात केली आहे.Baramati contest turned into Modi Modi against Rahul, erased sharad pawar’s name politically

एरवी संपूर्ण राज्यभर किंवा अगदी देशभर प्रचार करून शेवटची सभा बारामतीत घ्यायची हा पवारांच्या राजकीय आयुष्यातला कायमचा शिरस्ता राहिला होता. त्याला 2019 ची लोकसभा निवडणूक देखील अपवाद ठरली नव्हती, पण 2024 मध्ये वातावरण एवढे बदलले आहे की, पवारांचे स्वतःचेच फोडाफोडीचे राजकारण त्यांच्यावर पूर्णपणे उलटून त्यांच्या पुतण्याने बंड करून अख्खा पक्ष तो घेऊन गेला. इतकेच नाहीतर, बारामतीत पुतण्याने इतके बळकट आव्हान उभे केले की, पवारांना संपूर्ण देश तर सोडाच, पण महाराष्ट्रभर फिरता येईनासे होऊन आपले सगळे लक्ष बारामती वर कॉन्सन्ट्रेट करावे लागले आहे. पवार आता पुरते बारामतीत अडकले आहेत. म्हणूनच ते बारामतीतले प्रत्येक गाव पिंजून काढायच्या मागे लागले आहेत.पवार बारामतीत अडकले असताना आत्तापर्यंत बारामतीत काका विरुद्ध पुतण्या आणि नणंद विरुद्ध भावजय अशी पवारांचीच आपापसांत लढाई असल्याचे भासत होते, परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरचा दौरा केला. तिथल्या जाहीर भाषणामध्ये त्यांनी बारामतीची लोकसभेची लढाई पूर्ण फिरवूनच टाकली. ती लढाई पवार काका – पुतण्याची किंवा नणंद – भावजयीची शिल्लकच ठेवली नाही. बारामतीतली लढाई फडणवीसांनी “मोदी विरुद्ध राहुल” अशी करून टाकली. सुनेत्रा पवारांना दिलेले मत हे मोदींकडे जाईल आणि सुप्रिया सुळेंना दिलेले मत हे राहुल गांधींकडे जाईल, असे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे एखादी मोठी कळ फिरावी तशी बारामतीतील निवडणूक फिरली आणि तिथेच खऱ्या अर्थाने पवार अस्वस्थ झाले!!

कारण बारामती सारख्या आपल्या राजकीय सातबाराच्या नावावर असलेल्या मतदारसंघात आपल्या “पवार” नावावर नव्हे, तर “मोदी” किंवा “गांधी” नावावर निवडणूक चालावी ही बाब खऱ्या अर्थाने पवारांना खटकणारी ठरली.

 भाजपचा खरा डाव

पण त्याही पलीकडे जाऊन एक मोठा राजकीय डाव फडणवीसांनी यातून साधला, तो डाव फारसा कोणाच्या लक्षात आला नाही. तो म्हणजे पवारांना राहुल गांधींच्या नावाने फडणवीसांनी डिवचले, हा होय. मूळात पवार 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून गांधी परिवारापासून पूर्णपणे अलग झाले. त्यांनी थेट सोनिया गांधींच्या परकीय मूळावर घाव घातला स्वतःच्या राजकीय कर्तृत्वावर भार देत स्वतंत्र पक्ष काढला. त्या पक्षाचे इतर राजकीय कर्तृत्व सोडून द्या, पण त्या पक्षाच्या नावावर, चिन्हावर आणि आपल्या पवार नावावर त्यांनी सतत बारामती आपल्याकडे राखून ठेवली. त्या मतदारसंघात त्यांनी इतर कोणत्याही नावाला शिरकाव करून दिला नव्हता. त्यामुळे बारामतीत “पवार जिंकले” किंवा “पवार हरले”, “पवारांचे मताधिक्य वाढले” किंवा “पवारांचे मताधिक्य घटले”, या भोवतीच निवडणूक फिरली पाहिजे, हा पवारांचा कटाक्ष राहिला. नेमक्या पवारांच्या याच नॅरेटिव्हला फडणवीसांनी “मोदी विरुद्ध राहुल” हा नॅरेटिव्ह सेट करून सुरुंग लावला आणि हा राजकीय सुरुंग फक्त पवारांच्या लक्षात आला. आपल्या मुलीच्या निवडणुकीपाई भाजपने आपल्याला बारामती मतदारसंघात तर अडकवून ठेवलेच, पण आता बारामतीतली निवडणूक सुद्धा भाजप “पवार केंद्रित” न ठेवता, ती “मोदी विरुद्ध राहुल” अशी करून “पवार” नावाला दुय्यम स्थानावर ढकलून दिले.

भाजपचा डाव पवारांनी ओळखला आणि म्हणूनच ते अस्वस्थ झाले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडून येवोत किंवा सुनेत्रा पवार निवडून येवोत, कोणताही “पवारच” निवडून आला ही टिमकी मारण्याची सोय देखील फडणवीसांनी “मोदी विरुद्ध राहुल” असा नॅरेटिव्ह सेट करून उरू दिली नाही, ही खरी पवारांची गोची झाली.

– पवारांचा राजकीय सातबारा होतोय धूसर

“बारामती म्हणजे पवार”, “पवार म्हणजे बारामती” या पॉलिटिकल इक्वेशनला कायमचा उद्ध्वस्त करणारा नॅरेटिव्ह फडणवीस यांनी बारामतीत सोडून दिला. बारामतीची लढाई “मोदी विरुद्ध राहुल” अशी करण्यात केवळ सुप्रिया सुळे यांना हरविणे एवढा पुरताच तो विषय मर्यादित ठेवला नाही. फडणवीसांनी त्या पलीकडे जाऊन बारामतीच्या राजकीय सातबारा वरून “पवार” नावाला खोडून टाकण्याची हिंमत दाखवली, हे खरे बारामतीच्या “मोदी विरुद्ध राहुल” या लढाईचे राजकीय रहस्य आहे… आणि म्हणूनच पवार खऱ्या अर्थाने हादरून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या गावोगावी हिंडत आहेत. दुष्काळाविषयी परामर्ष घेत आहेत आणि अजितदादांच्या नावाने त्यांनी कामे केली नाहीत म्हणून खडे फोडत आहेत!!

Baramati contest turned into Modi Modi against Rahul, erased sharad pawar’s name politically

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात