महाराष्ट्रात महाविकास सरकार आल्यापासून एक कायम आरोप होत आला आहे, तो म्हणजे राज्यपालांआङून भाजप राजकारण खेळतो आहे…!! अन्य काही बाबतीत हे काही प्रमाणात जरी खरे असले, तरी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र राज्यपालांआडून भाजपपेक्षा राष्ट्रवादीने स्वत:चे राजकारण साधून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. Congress presides over assembly; Aggressive letter from CM; NCP’s “cautious” side !!
विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड होताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या तिघांचीही त्याला संमती होती. कारण त्यावेळी तो महाविकास आघाडीचा “हनिमून पिरीयड” होता. मधल्या काळात महाराष्ट्रातल्या राजकीय नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेले आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देताना काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. पक्ष म्हणून काँग्रेसचा निर्णय योग्य होता. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये त्यामुळे अविश्वास निर्माण झाला त्यावर काँग्रेसला अद्याप तोड काढता आलेली नाही. किंबहुना नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेल्या सुमारे सव्वा वर्षात काँग्रेसचेच नेते विधानसभा अध्यक्षपदापासून वंचित राहिले आहेत. यात राजकीय तोटा शिवसेना अथवा राष्ट्रवादीचा झालेला नाही तर तो काँग्रेसच्या झाला आहे.
त्यातही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आज पर्यंत जो घटनात्मक पेच तयार झाला त्याचा अतिशय चलाखीने वापर राष्ट्रवादी काँग्रेसने करून घेतला आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि संग्राम थोपटे ही जी दोन नावे सुचवली आहेत ती शरद पवारांना मान्य नाहीत. कारण पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांचा स्वतःचा जुना राजकीय पंगा आहे, तर संग्राम थोपटे यांचे पिताश्री अनंतराव थोपटे यांच्याशी पवारांचा त्याहीपेक्षा जुने राजकीय वैर आहे. संग्राम थोपटे यांना अध्यक्षपदासाठी मान्यता दिली तर भविष्यात ते “विशिष्ट अडचणी” तयार करू शकतात, याची पवारांना शक्यता वाटते. महाविकास आघाडीचे संख्याबळ जेव्हा दोलायमान अवस्थेत आहे तेव्हा आपल्या विरोधी गटाचा नेता विधानसभेचे अध्यक्ष असणे हे शरद पवारांना खपणारी गोष्ट नाही. त्यामुळेच राज्यपालांनी जी कायदेशीर भूमिका घेतली तिला पवारांनी एक प्रकारे पाठिंबा दिला आहे.
किंबहुना काल मुख्यमंत्र्यांनी आक्रमकपणे राज्यपालांना पत्र लिहीपर्यंत पवारांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चकार शब्द काढला नव्हता. अजित पवारांनी देखील घटनात्मक पेचप्रसंग नको म्हणून निवडणूक टाळा असा सल्ला काल दिला नव्हता. तर आज तो सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांची आक्रमकता या निमित्ताने पवारांनी “उघड्यावर” येऊन दिली आहे. किंबहुना “उघड्यावर” पाडली आहे, असे म्हणणे योग्य ठरेल…!!
त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळून काँग्रेसला त्या पदापासून पुन्हा एकदा वंचित ठेवले आहे. एकूण घटनाक्रमाकडे वर उल्लेख केलेल्या दृष्टीने पाहिले, तर महाविकास आघाडीचे नेते जरी भाजपवर राज्यपालांआडून राजकारण खेळण्याचा आरोप करत असले तरी प्रत्यक्षात राज्यपालांआडून राष्ट्रवादी आणि विशेषतः शरद पवार हेच राजकारण खेळल्याचे विधानसभा अध्यक्ष निवडणूक रद्द करण्यातून स्पष्ट झाले आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App